प.बंगालमध्ये पुन्हा लोकशाहीची हत्या

    11-Dec-2020
Total Views |

abvp_1  H x W:







एबिव्हीपी आणि तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेमध्ये हाणामारी


कोलकाता: भाजप पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या प.बंगाल येथील दौऱ्यादरम्यान झालेल्या हल्ल्याचे प्रकरण अजूनही शांत झालेलं नाही. अशातच आता एबिव्हीपी आणि तृणमूल छात्र परिषद यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. प.बंगालमध्ये एबिव्हीपीच्या एका मोर्च्यादरम्यान ही घटना घडल्याचे समोर येत आहे.
 
 
 
 
 
 
 
 
एबिव्हीपीचे राष्ट्रीय सचिव सप्तर्षी सरकार यांनी विद्यार्थ्यांना क्रूरपणे करण्यात आलेल्या मारहाणीचे फोटो ट्विट करत, प.बंगालमध्ये घडणाऱ्या या घटनांचा तीव्र निषेध व्यक्त केला. त्याचप्रमाणे "ममता बॅनर्जी यांना हुकुमशहा म्हणण्यास काहीच हरकत नाही. त्यांनी सत्तेत राहण्यासाठी लोकशाहीची हत्या केली आहे. बंगालमध्ये सध्या भयानक वातावरण आहे." असं म्हणत सप्तर्षी ह्यांनी सदर मारहाणीचा निषेध व्यक्त केला.