ठाण्यातील 'कोविड हेल्थ सेंटरचे' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई लोकार्पण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020
Total Views |

thane_1  H x W:








२०८ ऑक्सिजनयुक्त बेडसह इतर एकूण ३०६ बेडचे अत्याधुनिक 'कोविड हेल्थ सेंटर' आजपासून ठाणेकरांच्या सेवेत दाखल



ठाणे: ठाणे महापालिका क्षेत्रातील तसेच परिसरातील कोरोना बाधित नागरिकांना तातडीने औषधोपचार व वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोनातून घोडबंदर परिसरातील 'बोरिवडे' येथे कोविड हेल्थ सेंटर उभारण्यात आले. ठाणे महानगरपालिका आणि झी इंटरटेन्टमेंट एंटरप्रायझेस लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अत्याधुनिक सुविधायुक्त उभारण्यात आलेल्या कोविड हेल्थ सेंटरचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
 
 
 
संपूर्ण देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे यासाठी संपूर्ण शासकीय यंत्रणा कोरोना विरोधी लढ्यात सक्रीय आहे. प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब-माझी जबाबदारी या न्यायाने आचरण ठेवले आणि शासनाच्या सुचनांचे काटेकोरपणे पालन केल्यास कोरोनाची दुसरी लाट थोपविणे सहज शक्य आहे. यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. संपूर्ण प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीला जनतेने दिलेल्या साथीमुळे, सहकार्यामुळे आपण कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेऊ शकलो. शासनाने जबाबदारी घेतली आहे. आपण फक्त खबरदारी पुढील काळात घेतल्यास करोना शुन्यावर आणणे शक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले, "कोरोना आपत्तीमध्ये राज्यशासनाने घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यात मृत्यूदर कमी करण्यास यश मिळाले आहे. इतर राज्य देखिल महाराष्ट्र शासनाचे अनुकरण करतात.
 
 
सदर कार्यक्रमाला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा, नगरसेवक नरेश मणेरा, नगरसेवक सिद्धार्थ ओवळेंकर, अतिरिक्त आयुक्त(१) गणेश देखमुख यांच्यासह महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
 
  
@@AUTHORINFO_V1@@