भोर दाम्पत्याचा छायाचित्रणाचा ब्रॅण्ड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2020
Total Views |

BHor_1  H x W:
 
पुण्याच्या तरुण छायाचित्रकार प्रियदर्शिनी व सचिन भोर या तरुण दाम्पत्याने छायचित्रणाच्या या स्पर्धात्मक सागरांमध्ये २००६ नंतर आपल्या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वल्हवायला सुरुवात केली आपली नौका. सुकाणूवर अचूक ‘कंट्रोल’ ठेवून या फोटोग्राफर दाम्पत्याने लग्नापासून तर मधुचंद्रानंतर गर्भधारणा, बाळ जन्माला येणं, त्याचे मोठे मोठे होत जाणे इथपर्यंत फोटोग्राफी सर्व्हिस सुरु करुन एक आगळावेगळा ‘ब्रॅण्ड’ निर्माण केला आहे.
 
 
 
छायाचित्रणात पूर्वी म्हणजे २० वर्षांपूर्वी फार मोजकीच नावे पुढे यायची, म्हणजेच ती सुप्रसिद्ध असायची. पुढे-पुढे जसजशी आधुनिक साधने विकसित झाली, हे तंत्रज्ञान ‘क्वाँटिटी’ने विस्तारलं आणि ‘क्वॉलिटी’ने तितकसं विस्तारलं नाही. आधुनिक कॅमेरे, मोबाईलमधील कॅमेरे यांच्यामुळे प्रत्येक जण स्वत:ला ‘फोटोग्राफर’ समजू लागला. लौकिक अर्थाने ही बाब दिलासादायक असली तरी ‘उत्कृष्टता’ या निकषप्रणालीला गौणत्व आल्याचे निरीक्षणात येते. प्रत्येक जण मोबाईलमध्ये त्याला हवे तसे फोटो, प्रसंग ‘कॅच’ करीत असतो. १००-२०० ‘स्नॅप्स’मधून क्वचित एखादा फोटो हा सर्वार्थाने व्यवस्थित असतो किंवा मिळतो. असं साधारणपणे प्रत्येक मोबाईलधारक कुटुंबाने अनुभवलेलं असतंच. अशा पार्श्वभूमीवर छायाचित्रण क्षेत्राने गेल्या दशकापासून ‘कॉर्पोरेट’स्वरुप मिळवून छायाचित्रणाचे महत्त्व विशद करण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. ही स्थिती, छायाचित्रण कलेची नवी पहाट म्हणून संबोधावी लागेल.
 
 
मी कलाध्ययन करीत प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून काम करीत होतो. तेव्हा ज्येष्ठ पत्रकार पन्नालालजी सुराणा यांनी मला एक जबाबदारी सोपविली होती. चाळीसगाव येथील जगप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूंस यांची मुलाखत घेण्यात मला यश लाभले होते. त्यांचे त्यावेळेचे एक विधान मला आजही अत्यंत महत्त्वाचे वाटते. ते म्हणाले होते, “ ‘छायाचित्रण’ या शब्दांतच त्याचा आशय सामावलेला आहे. आपण जे फोटो काढतो, तो वस्तूवर वा व्यक्तीवर पडलेल्या प्रकाशाचा काढत नाही, तर त्या वस्तू वा व्यक्तीवर पडलेल्या छायेचा आपण फोटो काढतो, छायेचं चित्रण आपण कॅमेराच्या साहाय्याने करीत असतो.”
 
 
आधुनिक तंत्रज्ञान कितीही विकसित झाले तरी ‘व्ह्यू-फाईंडर’द्वारे पाहताना आपल्याला प्रकाशाऐवजी छायाभेदच अधिक दिसतात. म्हणून आपण छायेचंच चित्रण करीत राहणार.”जागतिक स्तरावर डब्ल्यू. बी. अ‍ॅडिन, स्टीव्ह मॅच्युरी, डारोथिया लॅज, अ‍ॅनसेल अ‍ॅडमस, रीचर्ड अ‍ॅव्हडन अशा विविध कौशल्यांनी निपुण मंडळींनी छायाचित्रण क्षेत्रात नाव कमावलेले आहे. भारत स्तरावरदेखील रघुराय, सुधीर शिवराम, दाबु रतनानी, प्रबुद्ध दासगुप्ता, अतुल कसबेकर, गौतम राजाध्यक्ष, संदेश भंडारे, विकास पेटकर, विश्वास वसेकर, जयनाथ वर्मा, रघुवीर सिंह, बोमण इराणी, धवल धैर्यवान, कुलवंत राय, भालचंद्र दत्तात्रय मोंढे अशी राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रकरांची नावे आपल्याला ‘शॉर्टलिस्ट’ करता येतील. तथापि, भारताची एकूण लोकसंख्या पाहता ही व अशी छायाचित्रण क्षेत्रातील नावे फारच कमी आहेत, असे वाटायला लागते.
 
 
एकट्या छायाचित्रण अर्थात फोटोग्राफी क्षेत्रात अनेक प्रकारच्या विशेष विभागांमध्ये ‘स्पेशालिटी’ असलेल्या उपशाखाआहेत. ‘स्थिरछाया चित्रण’, ‘इंजिनिअरिंग फोटोग्राफी’, ‘एरियल फोटोग्राफी’, ‘वेडिंग फोटोग्राफी’, ‘पोट्रेट फोटोग्राफी’, ‘टुरिझम फोटोग्राफी’, ‘मशीन-टूल फोटोग्राफी’, ‘स्काय फोटोग्राफी’, ‘नेचर फोटोग्राफी’, ‘वाईल्ड फोटोग्राफी’, ‘आर्किटेक्चरल फोटोग्राफी’, ‘डॉक्युमेंट फोटोग्राफी’, ‘मॉडेल फोटोग्राफी’, ‘सी फोटोग्राफी’, ‘मायक्रो फोटोग्राफी’, ‘हिस्ट्रॉरिकल फोटोग्राफी’, ‘बिल्डिंग्ज फोटोग्राफी’, ‘प्रोडक्ट फोटोग्राफी’, ‘मॉन्युमेंट फोटोग्राफी’, ‘कमर्शिअल फोटोग्राफी’, ‘चाईल्ड फोटोग्राफी’, ‘बॉर्न चाईल्ड फोटोग्राफी’, ‘कीड्स फोटोग्राफी’ अशा अनंत विषयांमध्ये फोटोग्राफी या क्षेत्राने प्रवेश करुन, स्थिर झालेला आहे हा व्यवसाय...!!
 
 
पुण्याच्या तरुण छायचित्रकार प्रियदर्शिनी व सचिन भोर या तरुण दाम्पत्याने छायचित्रणाच्या या स्पर्धात्मक सागरांमध्ये २००६ नंतर आपल्या कॅमेऱ्यांच्या साहाय्याने वल्हवायला सुरुवात केली आपली नौका. शटरवर अचूक ‘कंट्रोल’ ठेवून या फोटोग्राफर दाम्पत्याने लग्नापासून तर मधुचंद्रानंतर गर्भधारणा, बाळ जन्माला येणं, त्याचे मोठे मोठे होत जाणे इथपर्यंत फोटोग्राफी सर्व्हिस सुरु करुन एक आगळावेगळा ‘ब्रॅण्ड’ निर्माण केला आहे.
 
 
वर्गात एकत्र शिकलेल्या या जोडीने संसारही एकत्र करायचा निर्णय घेऊन व्यवसायही एकत्रितच करायचा निर्णय घेतला आणि अल्पावधित अन् तेही पुण्यात म्हणजे दु. १ ते ४ हा वेळ वगळून उर्वरित वेळेत, चांगल्या व उत्कृष्ट गोष्टींना ‘वा वा, छान’ म्हणत मनापासून दाद देणाऱ्या पुणेकरांच्या ‘कॅलक्युलेटेड’ नगरीत, व्यावसायिक स्थिरता मिळविली. मी तर म्हणेन, कुठल्याही आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या यशापेक्षा भोर दाम्पत्याचं हे यश कुठेही कमी नाही.
 
 
प्रियदर्शनीला एक प्रश्न विचारला तेव्हा ती म्हणाली की, “सर, आधुनिक तंत्र माध्यमे आणि साधने कितीही विकसित स्वरुपात हाती आली, तरी छायाचित्रकाराचा दृष्टिकोन, कल्पकता, समोरच्या वस्तू वा व्यक्ती (मग बॉर्न चाईल्डपासूनपुढे कितीही वयापर्यंत) यांची माहिती वस्तू वगळून इतर ‘लाईव्ह’ गोष्टींची मानसिकता वा ‘सायकॉलॉजी’ जाणून मग फोटोग्राफी केली म्हणून आम्ही अल्पावधीत यशस्वी झालो.” प्रियदर्शनीच्या वयापेक्षा तिने मांडलेला हा विचार वयस्कर आणि प्रगल्भ होता व आहे. अनुभव घेताना जर मन, बुद्धी आणि विचार निरागास आणि जमिनीवरच ठेवले तरी मोबाईल फोटोग्राफ्रर झालेल्या कोट्यवधींच्या संख्येतही प्रियदर्शनी-सचिन सारखे आर्टिस्ट फोटोग्राफर हे हिऱ्यासारखे चमकत स्वयंप्रकाशित होतात. त्यांच्या छायाचित्रणप्रवासी नौकेस हार्दिक शुभेच्छांसह सदिच्छा!!
 
 
- प्रा. गजानन शेफाळ 
@@AUTHORINFO_V1@@