किरीट सोमय्यांकडून ठाकरे सरकारचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

    11-Dec-2020
Total Views |

somayya_1  H x






केंद्राच्या मालकीच्या जमिनीचा खासगी बिल्डरला मोबदला


मुंबई: ठाकरे सरकार सत्तारूढ होताच भूखंडाच्या श्रीखंडाची अनेक प्रकरणे होत आहेत. आणि आता आणखी एक भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाले आहे. केंद्राच्या मालकीच्या जागेचा मोबदला खासगी बिल्डरला देण्याचा आदेश ठाकरे सरकारने दिला आहे. अंधेरी येथे महाकाली गुहा पाहायला जाण्यासाठी गेली १०६ वर्षे वापरात असलेल्या रस्त्याच्या जागेची मालकी केंद्र सरकारच्या खात्याकडे आहे. मात्र त्याचा मोबदला खासगी बिल्डरला देण्यासाठी उपरोक्त आदेश काढण्याचा भ्रष्टाचाराचा विक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राज्य सरकारने करून दाखविला आहे.
 
 
 
 
 
 
 
भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा अजब भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची कागदपत्रे त्यांनी माहितीच्या अधिकारात मिळविल्यानंतर हा प्रकार स्पष्ट झाला. सोमय्या यांनी सांगितले की, ठाकरे सरकारने २६ सप्टेंबर २०२० रोजी एक परिपत्रक काढले असून महाल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड यांना संबंधित भूखंडाचा मोबदला म्हणून ७४ कोटी रुपये देण्याचे निर्देश आहेत. भ्रष्टाचाराचे हे अनोखे प्रकरण मुंबईतील जुहू विलेपार्ले लिंक रोडवरील वेरावली गावाजवळच्या भूखंडाशी संबंधित आहे.
 
 
 
गेली १०६ वर्षे लोक ज्या रस्त्याचा वापर गुहा पहायला जाण्यासाठी करतात तो या अमरोही स्टुडिओजवळच्या भूखंडातून जातो. मुळात ही जमीन १९१४ साली भारत सरकारच्या खात्याकडे हस्तांतरित झाली असताना त्याचा नवा मालक मानले जाणारे कमाल अमरोही स्टुडिओ मुंबई महानगरपालिकेकडे टीडीआरची मागणी कशी करू शकतात, हा महत्त्वाचा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला आहे. ठाकरे सरकारने २६ सप्टेंबर २०२० रोजी एक परिपत्रक जारी करून २०३४ च्या विकास आराखड्याबाबत स्पष्टीकरण दिले आणि त्याच्या आधारे मुंबई महानगरपालिकेने आपले मत बदलले. आता केंद्र सरकारच्या मालकीच्या असलेल्या आणि गेली शंभर वर्षे सार्वजनिक रस्त्यासाठी वापरात असलेल्या जागेसाठी खासगी बिल्डरला मोबदला देण्याची प्रक्रिया चालू आहे, असे सोमय्या यांनी स्पष्ट केले.