ही लोकशाही आहे का?

    10-Dec-2020
Total Views | 146
nadda_1  H x W:








देवेंद्र फडणविसांचा ममता दीदींना थेट सवाल





मुंबई: २०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे.पी.नड्डा दौऱ्यावर असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर जमावाने दगडफेक केली. याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत या हल्ल्याचा निषेध केला. ममता दीदींना 'ही लोकशाही आहेत का?'असा प्रश्न करत फडणविसांनी दोषींवर कारवाई करण्याची सुद्धा मागणी केली. सदर हल्ला झाला, तेव्हा जे.पी.नड्डा यांच्यासोबत कैलाश विजयवर्गीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सुद्धा गाडीत होते.


 
 
 
जे.पी.नड्डा पश्चिम बंगालमध्ये पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधत आहेत. यादरम्यान आज दुपारी सिराकोल परिसरातील दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. याबाबत कैलाश विजयवर्गीय यांनी टि्व्टरवर एक व्हिडीओ टाकून माहिती दिली.
 
 
 
"बंगाल पोलिसांना नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस त्यांच्या सुरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरले. पोलिसांसमोर तृणमूल कॉंग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेका केल्याचे", कैलाश विजयवर्गीय यांनी म्हटले. याआधी दिलीप घोष यांनी बुधवार दि.९ डिसेंबर रोजी जे. पी. नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121