प. बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डांच्या ताफ्यावर दगडफेक

    10-Dec-2020
Total Views |

j p nadda_1  H


तृणमुल काॅंग्रेसकडून दौऱ्याला हिंसक रुप देण्याचा प्रयत्न

कोलकाता - भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्याच्यासोबत पार्टीचे जनरल सेक्रेटरी आणि पश्चिम बंगालमधील नेते कैलाश विजयवर्गीय देखील आहेत. आज दुपारी सिराकोल परिसरातून या नेत्यांच्या गाड्यांच्या ताफा जात असताना त्यावर तुफान दगडफेक करण्यात आली. 

 
 
२०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे.पी.नड्डा सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. त्याठिकाणी ते पार्टीच्या कार्यकर्त्यांना भेटण्याबरोबरच नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशातच त्यांचा दौऱ्यावर हिंसक वळण मिळाले आहे. नड्डांसोबत कैलाश विजयवर्गीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आहेत. आज दुपारी सिराकोल परिसरातील दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. 
 
 
कैलाश विजयवर्गीय यांनी टि्व्टरवर एक व्हिडीओ टाकून माहिती दिली. "बंगाल पोलिसांना नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस त्यांच्या सुरक्षा करण्यामध्ये अपयशी ठरले. पोलिसांसमोर तृणमूल काॅंग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेका केल्याचे", त्यांनी म्हटले. याआधी दिलीप घोष यांनी बुधवारी जे पी नड्डा उपस्थित असणाऱ्या भाजपाच्या कार्यक्रमात योग्य सुरक्षा नसल्याचा आरोप केला होता. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला होता.