जनतेचा विश्वास हेच माझे बळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Poonam Mahajan _1 &n
 
 
 
कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या दूर करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला भारतीय जनता युवा मोर्चाच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि उत्तर-मध्य मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद दिला. आपल्या मतदारसंघात विविध सेवाकार्ये चालविली, त्यामुळे गरजूंना त्याचा मोठा लाभ झाला. स्वत: सेवाकार्यांमध्ये उतरून पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांसह जनतेचाही विश्वास जिंकला.
नाव : पूनम महाजन
राजकीय पक्ष : भाजप
पद : खासदार
मतदारसंघ : उत्तर-मध्य मुंबई
 
 
साधारणपणे २०१९ सालच्या डिसेंबर महिन्यापासून कोरोना संसर्गाच्या बातम्या यायल्या लागल्या. मात्र, त्यावेळी भारतात हा संसर्ग झाला नव्हता. मात्र, साधारणपणे फेब्रुवारी महिन्यापासून भारतातही कोरोना संसर्ग पसरण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना सुरू केल्या, संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने मार्च महिन्यात ‘टाळेबंदी’ लागू केली. ‘टाळेबंदी’ ही जनतेच्या हितासाठीच असली, तरी त्यामुळे जनतेला काही समस्यांचाही सामना करावा लागला; अर्थात ही गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लक्षात घेतली होती, त्यामुळेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना- मंत्री, खासदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष आदींना सेवाकार्ये करण्याचे निर्देश दिले होते. भाजपच्या कार्यसंस्कृतीप्रमाणे पंतप्रधानांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभला.
 
 
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांनी केवळ आपल्या मतदारसंघातच नव्हे, तर मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी मदतीचा गरज होती, त्या-त्या ठिकाणी मदत पोहोचविली. विशेष म्हणजे, यासाठी पूनम महाजन यांनी केवळ निर्देश दिले नाहीत, तर स्वत:देखील त्यामध्ये पुढाकार घेतला. त्यामुळेच जनतेच्या विश्वासाच्या कसोटीवर ‘कोविड योद्धा’ म्हणून पूनम महाजन यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
 




Poonam Mahajan _3 &n
 
 

"राज्य सरकारने तर अगदीच निष्क्रिय भूमिका यामध्ये बजाविली; अर्थात पूनम महाजन यांनी त्याकडे लक्ष न देता आपले काम सुरूच ठेवले. कोरोना संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते. मात्र, मतदारसंघातील नागरिकांची काळजी घेणे ही माझी जबाबदारीच आहे. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासून माझ्या मतदारसंघातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत आमचे कार्यकर्ते पोहोचले आणि त्यांच्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कार्यकर्तेही आपल्या जीवाची पर्वा न करता कार्यरत होते. जनता आणि कार्यकर्त्यांचा विश्वास हेच माझे बळ आहे!"
 
खा. पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली २४ मार्चपासूनच म्हणजे ‘टाळेबंदी’ लागू झाल्यापासूनच उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघामध्ये सेवाकार्यांना प्रारंभ करण्यात आला. मतदारसंघाची बांधणी महाजन यांनी अतिशय उत्तम प्रकारे केली आहे, त्यामुळे मतदारसंघातील प्रत्येक मतदारासोबत त्यांचा नियमित संवाद असतो. त्यामुळे महाजन यांनी आपल्या सहकार्‍यांसोबत सर्वप्रथम लोकसभा मतदारसंघाची विधानसभा आणि वॉर्डस्तरीय विभागणी केली. प्रत्येक विभागातील रहिवाशांची, रहिवासी भागांची माहिती घेतली आणि त्यानंतर निर्जंतुकीकरणास प्रारंभ केला.
 
 
विशेष बाब म्हणजे, २८ तारखेपासून या कामास प्रारंभ झाला आणि मुंबईत सर्वप्रथम निर्जंतुकीकरण पूनम महाजन यांनीच सुरू केले. त्यामध्ये वॉर्ड अध्यक्ष आणि भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अगदी दिवसरात्र मेहनत घेतली. बर्‍याच वेळा बहुमजली रहिवासी इमारतींमध्ये निर्जंतुकीकरणासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना लिफ्टचा वापर करण्यास मनाई करण्यात आली. तेव्हा अगदी २० मजली इमारतींमध्येही जिन्यांचा वापर करून कार्यकर्त्यांनी निर्जंतुकीकरण पार पाडले. त्यानंतर महाजन यांनी आपल्या मतदारसंघात हेल्पलाईन सुरू केली, त्याची जबाबदारीदेखील कार्यकर्त्यांनी पार पाडली. मतदारसंघातील नागरिकांच्या प्रत्येक समस्येला या हेल्पलाईनच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला गेला. दरदिवशी साधारणपणे एका कार्यकर्त्याने चार ते साडेचार हजार कॉल्सना उत्तर दिले. अशाप्रकारे सुनियोजित हेल्पलाईनची रचना म्हणजे आपत्तीच्या काळात प्रभावी काम करण्याचे उत्कृष्ट उदाहरण ठरले आहे.
 
 
‘टाळेबंदी’मुळे स्थलांतरित मजुरांना सर्वाधिक फटका बसला. अनेक स्थलांतरित मजूर हे बांधकामांवर काम करणारे होते, तर काही लोक हे फेरीवाले होते. मात्र, ‘टाळेबंदी’मध्ये सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने त्यांच्या हाताला काम उरले नाही आणि काम नाही म्हणून आर्थिक संकटही निर्माण झाले. मात्र, त्यांच्या जेवणाची चिंता दूर करण्यासाठी प्रथम कार्यकर्त्यांनी आपल्या घरातून खिचडी बनवून त्याचे गरजूंना वाटप केले. त्यानंतर मतदारसंघात ठिकठिकाणी जेवणाचे स्टॉल्स उभारण्यात आले, त्यातून दरदिवशी हजारो गरजूंना लाभ झाला. मतदारसंघामध्ये पूनम महाजन यांनी एकूण तीन लाख आठ हजार २०० फूड पॅकेट्सचे वाटप केले, तर ९१ हजार अन्नधान्य पॅकेट्सचे (रेशन) वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विनामूल्य भाजीपाला, फळे यांचेही स्टॉल मतदारसंघात ठिकठिकाणी कार्यरत होते.
 
 
 
Poonam Mahajan _3 &n
 
स्थलांतरित मजुरांसाठी सर्वांत महत्त्वाचे होते ते म्हणजे आपापल्या घरी जाणे. मात्र, त्यासाठी सरकारने वैद्यकीय प्रमाणपत्राची अट ठेवली होती. त्यामुळे स्थलांतरित मजुरांकडून आवश्यक ते अर्ज भरून घेणे आणि त्यांना त्याच्या राज्यात सुखरूप पोहोचविण्यासाठीदेखील खा. पूनम महाजन यांनी सोय केली. रस्तेमार्गाने प्रवास करणारे १९ हजार, श्रमिक विशेष रेल्वे आणि बसद्वारे प्रवास करणारे ५० हजार स्थलांतरित मजुरांना आवश्यक ते कपडे, औषधे आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्यात आला.
 
 
मतदारसंघातील नागरिकांना फेस मास्कचे वाटप करण्यात आले. साधारणपणे एक लाख १२ हजारांहून अधिक मास्कचे वाटप करण्यात आले, त्यामध्ये ११ हजार २५० कार्यकर्ते सक्रिय होते. मतदारसंघातील वृद्ध आणि आजारी लोकांची काळजीदेखील महाजन यांनी घेतली. अशा व्यक्तींच्या सेवेसाठी ७० कार्यकर्त्यांना नियुक्त करण्यात आले होते, त्यामुळे संकटाच्या काळात आपली काळजी घेणारे आहेत याचे समाधान नागरिकांना मिळाले. पूनम महाजन यांच्या नेतृत्वाखाली एकूण सहा लाख ३० हजार ५०० गरजूंना मदत करण्यात आली. हा आकडा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण राज्यातील छोट्या शहरांची लोकसंख्या पाच ते सहा लाखांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पूनम महाजन यांनी कार्यकर्त्यांचे अतिशय सुयोग्य नियोजन करून अडचणी कमी करण्याचा प्रयत्न केला.
 
 



Poonam Mahajan _2 &n 
 
अर्थात, हे सर्व करीत असताना महापालिका आणि राज्य सरकारकडून अतिशय नकारात्मक अनुभव आला. मदत करण्यापेक्षा त्यात खोडा कसा घालता येईल, असे प्रयत्न झाले. दुर्दैवी म्हणजे, पूनम महाजन यांनी आपल्या मतदारसंघात निर्जंतुकीकरणाची मोहीम सुरू केल्यानंतर राज्य सरकारमधील एका तरुण मंत्र्याने ट्विट करून, “हे निर्जंतुकीकरण अनधिकृत आहे,” असे सांगितले. मात्र, मतदारसंघातील लोकांचा पूनम महाजन यांच्यावरील विश्वास एवढा होता की, त्यांनी अशा ट्विट्सना अजिबात महत्त्व दिले नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@