‘क्यूंकी काम बोलता हैं।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Atul Bhat_1  H


’कोरोनासारख्या जागतिक महामारीने मुंबईसह महाराष्ट्रात हाहा:कार माजविला असताना राज्यातील सत्ताधारी पक्षांतील नेत्यांवर विसंबून न राहता, प्रत्येक वेळी ‘वर्क फ्रॉम फ्रंट’ तत्त्वाचा अवलंब करून कांदिवली पूर्व मतदारसंघासह मुंबईतील अनेक भागांमध्ये कोरोनाच्या विरोधातील लढाईत स्वतःला झोकून देणारे भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा आढावा घेणारा हा लेख...
नाव : अतुल भातखळकर
राजकीय पक्ष : भाजप
पद : प्रभारी, मुंबई महानगरपालिका
मतदारसंघ ः आमदार, कांदिवली पूर्व
 
चीनपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीने जगभरात हाहा:कार माजविला असताना, मुंबईसह महाराष्ट्रसुद्धा त्यापासून अपवाद राहिला नाही. परंतु, अशा जागतिक महामारीला सामोरे जाताना राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून केवळ शब्दांच्या वाफा दवडल्या जात असताना भाजपचे नेते व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कोरोनाच्या या लढाईत स्वतःला झोकून दिले. देशाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देशात कडक ‘लॉकडाऊन’ लावला. अशा वेळी जनतेला आवश्यक ते साहाय्य करणे हेच लोकप्रतिनिधीचे कर्तव्य असते. त्याचाच प्रत्यय अतुल भातखळकर यांनीसुद्धा दिला.
 
 
‘लॉकडाऊन’च्या पहिल्या दिवसापासून लोकांना आवश्यक आरोग्यविषयक सुविधा व घरगुती सामग्रीचा आवश्यक पुरवठा अविरतपणे मिळत राहावा, यासाठी अतिशय अचूक नियोजन त्यांनी केले. कांदिवली पूर्व मतदारसंघ हा अल्प व मध्यम उत्पन्न गटातील व झोपडपट्टीत राहणार्‍या कामगारांचा परिसर. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा करणे आवश्यक होते. कांदिवली पूर्व मतदारसंघातील हनुमाननगर, पोयसर, रामनगर यांसह कांदिवली व मालाड परिसरातील तब्बल ३० हजार ५०० कुटुंबांना मोफत अन्नधान्याचे वाटप त्यांच्यामार्फत करण्यात आले. केवळ धान्यवाटप करून चालणार नसल्याचे लक्षात आल्यामुळे दररोज १३ हजार ५०० पेक्षा अधिक लोकांना चार लाख ५० हजारांपेक्षा जास्त जेवणाच्या पॅकेट्सचे वाटपसुद्धा अतुल भातखळकर यांच्यामार्फत करण्यात आले.
 
 
"कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबे संकटात सापडली. हातावर पोट असणार्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अशा संकटकाळी गरजूंना सावरण्याच्या हेतूने मदतीचा हात पुढे केला. महामारीचा काळ अद्यापही संपलेला नाही. आजही अनेक कुटुंबे संकटात आहेत, त्यामुळे शक्य होईल तितकी प्रत्येक मदत सर्वांनी केली पाहिजे."
 
 
केंद्र सरकारकडून शिधापत्रिकाधारकांना सहा महिन्यांचे धान्य मोफत देण्याकरिता गरीब कल्याण अन्न योजना राबविण्यात येत होती. परंतु, रोजगाराच्या निमित्ताने मुंबईत आलेल्या व कांदिवली परिसरात स्थायिक असलेल्या बिगर शिधापत्रिकाधारक तब्बल पाच हजार ७५० कुटुंबांना मोफत धान्यवाटपही भातखळकर यांच्यामार्फत करण्यात आले. ही सर्व कामे सुरू असताना कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये, याकरिता महापालिका आरोग्य विभाग व अग्निशमन दलाच्या माध्यमातून सुमारे ६८२ गृहनिर्माण सोसायट्या पूर्णपणे ‘सॅनिटाईझ’ करण्याचे कामसुद्धा करण्यात आले. कांदिवली पूर्व मतदारसंघात असलेल्या १६८ सार्वजनिक शौचालयातसुद्धा ‘सॅनिटायझर’ फवारणी करण्याचे काम अतुल भातखळकर यांच्यामार्फत करण्यात आले.
 
 
कोरोनाची वाढती साखळी रोखली जावी, याकरिता ‘तपासणी, निदान व उपचार’ या केंद्र सरकारच्या मोहिमेंतर्गत आ. अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून ‘डॉक्टर आपल्या दारी’ अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत कांदिवली पूर्व मतदारसंघात ३० ठिकाणी वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. ज्या अंतर्गत दहा हजारांपेक्षा जास्त लोकांना रोगानुसार मोफत औषधवाटप करण्याचे कामदेखील भातखळकर यांच्यामार्फत करण्यात आले. इतकेच नव्हे, तर ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळतील, अशांना तत्काळ उपचार मिळण्याकरिता दवाखान्याची उपलब्धतासुद्धा त्यांनी करून दिली. ४० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या होमियोपॅथी गोळ्यांचे व दोन हजार कुटुंबांना ‘आयुष’ काढ्याचे मोफत वाटपसुद्धा करण्यात आले.
 
 

Atul Bhatkhalkar _1  
 

कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबे संकटात सापडली. हातावर पोट असणार्‍यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अशा संकटकाळी गरजूंना सावरण्याच्या हेतूने मदतीचा हात पुढे केला. महामारीचा काळ अद्यापही संपलेला नाही. आजही अनेक कुटुंबे संकटात आहेत, त्यामुळे शक्य होईल तितकी प्रत्येक मदत सर्वांनी केली पाहिजे.
 
दररोज येणार्‍या तक्रारी लक्षात घेऊन कोरोनाबाधितांना रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध करून देण्यासह त्यांना योग्य उपचार मिळतील, याची व्यवस्थासुद्धा त्यांनी केली.कोरोनाच्या महामारीतही काही रुग्णालयांमध्ये केला जाणारा अक्षम्य दुर्लक्षपणा व वाढीव बिलांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. राज्य सरकारकडे अनेक वेळा तक्रार करूनसुद्धा कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचे लक्षात आल्याने अशा हॉस्पिटलच्या विरोधात भातखळकर स्वतः मैदानात उतरून रुग्णालय व्यवस्थापनाला धडा शिकविण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. मुंबईत रोजगाराकरिता आलेल्या नागरिकांना सर्व आवश्यक सुविधा देण्याची व्यवस्था केली जात असतानासुद्धा त्यांना त्यांच्या स्वगृही परत जायचे होते. परंतु, वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्राअभावी त्यांना त्यांच्या राज्यात परत जाणे शक्य होत नव्हते, अशावेळी भातखळकर यांनी केलेल्या अचूक नियोजनामुळे ११ हजार ३०० पेक्षा अधिक लोकांना गावी जाण्याकरिता वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र अतिशय सुलभतेने मिळाले.
 
 
यातील हजारो मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्याचे कामसुद्धा त्यांनी केले. कोरोनाच्या लढाईकरिता आवश्यक आरोग्यविषयक सोयी-सुविधा उभारण्याकरिता राज्य सरकारकडे मागणी करणे असो किंवा राज्यातील जनतेच्या हाती थेट पैसे पोहोचावे याकरिता आर्थिक पॅकेजची मागणी करणे असो किंवा कोरोनाच्या काळातही शाळांकडून केली जाणारी फीवसुली तत्काळ थांबवून कोरोना संपेपर्यंत फी राज्य सरकारने भरण्याची मागणी असो किंवा ऑनलाईन शिक्षणाकरिता प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मागणी करणे असो, या आणि अशा अनेक मागण्यांसाठी राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा करण्याचे कामसुद्धा भातखळकर यांनी केले. आपल्या आक्रमक; पण तितक्याच अभ्यासू विश्लेषणासाठी ओळखले जाणारे अतुल भातखळकर यांनी प्रसंगी विविध वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या माध्यमातून राज्य सरकारचा ढिसाळपणा जनतेसमोर आणला.
 
 
 
त्यातूनही राज्य सरकारचे डोळे उघडताना दिसले नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही रस्त्यांवर उतरून आंदोलनसुद्धा त्यांनी केले. मुंबईसह महाराष्ट्रातील वीजग्राहकांना अंदाजे बिल देण्याचे पाप या सरकारने केले होते. ती वीजबिले तत्काळ मागे घेऊन आधीच कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरिकांना वीजबिलात सवलत देण्याची मागणी करण्यासाठी त्यांनी कांदिवली येथील अदानीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचे कामसुद्धा त्यांनी केली. एकीकडे कोरोनाची लढाई सुरू असतानाच, मुंबईत तीन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे झोपडपट्टी व चाळीत राहणार्‍या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्तांना घरटी दहा हजार रुपये देण्याची मागणीसुद्धा त्यांनी राज्य सरकारकडे केली.
 
 
याकरिता त्यांनी मोठे आंदोलनसुद्धा केले. याच दरम्यान पालघर जिल्ह्यात दोन निष्पाप साधूंसह त्यांच्या चालकाची पोलिसांच्या समोर निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या गंभीर घटनेत दुर्दैवी हत्या झालेले चालक निलेश झा हे कांदिवली पूर्व मतदारसंघातील रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे कामसुद्धा भातखळकर यांनी केले. तसेच या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणीसुद्धा त्यांनी राज्य सरकारकडे वारंवार केली. कोरोनाच्या विरोधात भारताच्या एकूण परिस्थितीचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय व त्या निर्णयाची केलेली यशस्वी अंमलबजावणी यामुळे कोरोनाच्या विरोधातील लढाईत जगात सर्वांत उत्तम काम हे भारतात झाले.
 
 
हे सर्व काम जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी ‘छप्पन इंचाची ढाल’ हे पुस्तकसुद्धा त्यांनी याच काळात लिहिले.कोरोना महामारीच्या काळात प्रत्येक व्यक्ती स्वतःचा जीव वाचवत असतानासुद्धा आपल्या जीवाची पर्वा न करता, जनसेवेसाठी आपले आयुष्य वेचणार्‍या अतुल भातखळकर या जनसेवकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ तर्फे सलाम...!
- रामचंद्र नाईक 
@@AUTHORINFO_V1@@