‘ईडी’कडून आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची विचारणा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Dec-2020
Total Views |

Pratap Sarnaik_1 &nb
मुंबई : शिवसेनेचे प्रवक्ते आणि ठाण्यातील शिवेसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी  चार तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी आपल्याला आर्थिक आणि राजकीय प्रश्नांची विचारणा केल्याची माहिती खुद्द सरनाईक यांनीच प्रसारमाध्यमांना दिली. 
 
 
आजच्या चौकशीनंतर सरनाईक यांनी मुंबईत पत्रकारांशीही संवाद साधला. ते म्हणाले, “देशातील काळा पैसा व आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढण्यात ‘ईडी’ची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळेच ‘ईडी’च्या कुठल्याही प्रकारच्या चौकशीला सामोरा जाण्यास मी तयार आहे. आजच्या चौकशीदरम्यान ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी आर्थिक व राजकीय प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिली आहेत. त्यातून ‘ईडी’चे समाधान झाले की नाही, हे माहीत नाही. पण सर्व प्रकारच्या चौकशीला मी सहकार्य दिले आहे,” असा दावा त्यांनी केला. ‘टॉप्स’ समूह घोटाळा प्रकरणी सरनाईक हे अखेर चौकशीसाठी १० डिसेंबर रोजी ‘ईडी’ कार्यालयात हजर झाले. ‘ईडी’च्या बेलार्ड पीयर येथील कार्यालयात त्यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. दोनच दिवस आधी प्रताप सरनाईक यांनी ‘ईडी’च्या अटकेपासून सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळवले व गुरुवारी चौकशीसाठी ते ‘ईडी’समोर हजर झाले. या प्रकरणात ‘ईडी’ने ‘टॉप्स’ समूहाचे संचालक अमित चांदोले यांना आधीच अटक केली आहे. अमित चांदोले व सरनाईक कुटुंबाचे जवळचे संबंध आहेत. तसेच एका प्रकरणात चांदोले यांच्याकडून सरनाईक यांच्याशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा ईडीचा संशय आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@