शिकाऱ्यांपासून बचावासाठी जगातील एकमेव पांढऱ्या जिराफावर लावले 'हे' यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |
giraff_1  H x W


दोन पांढऱ्या जिराफांची झाली होती शिकार

मुंबई (प्रतिनिधी) - काही महिन्यांपूर्वी जगात शिल्लक राहिलेल्या तीन पांढऱ्या जिराफांपैकी दोन जिराफांचा शिकाऱ्यांनी जीव घेतला होता. त्यानंतर आता जगात उरलेल्या एकमेव पांढऱ्या जिराफाच्या संरक्षणार्थ त्याच्या शरीरावर जीपीएस टॅग बसविण्यात आला आहे. केनियामधील ग्रेझेस प्रातांमध्ये या जिराफाचे वास्तव्य आहे. 
 
 
गॅरिसा प्रातांमध्ये २०१७ साली सर्वप्रथम दोन दुर्मीळ पांढरे जिराफ (मादी आणि नर) आढळून आले होते. या जिराफांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याासाठी त्यांना गॅरिसा प्रातांमधील इजारा समुदाय संवर्धन क्षेत्रामध्ये ठेवण्यात आले. या दोन जिराफांचे मिलन होऊन गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात त्यांना पिल्लू झाले. मात्र, मार्च महिन्यात शिकाऱ्यांनी पांढऱ्या जिराफामधील मादी आणि तिच्या पिल्लाची शिकार केली. त्यानंतर पांढऱ्या नर जिराफाच्या संरक्षणाचा मुद्दा अधोरेखित झाला होता. त्यामुळे आता या जिराफाचे शिकाऱ्यांकडून संरक्षण होण्याच्या दृष्टीने येथील वन प्रशासनाने तंत्रज्ञानाची साथ घेतली आहे. या जिराफाच्या शरीरावर जीपीएस यंत्र लावण्यात आले आहे. या जिराफाच्या शिंगावर बसवलेल्या जीपीएस यंत्रामुळे वन्यजीव रक्षकांना त्याच्या स्थानाबद्दल प्रत्येक तासाला माहिती मिळले. यामाध्यमातून वन्यजीव रक्षक त्याच्यावर नजर ठेवून असतील. 

@@AUTHORINFO_V1@@