'कृषी आंदोलन' लक्ष्य करण्याचा पाकचा कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |
D_1  H x W: 0 x


चीनतर्फे आयएसआयला पाठवले ड्रोन




नवी दिल्ली : भारत-चीन तणावाची ठिणगी पडली असतानाच आता पाकिस्तानही नापाक कारवायांद्वारे डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्य करण्यासाठी पंजाबमध्ये सुरू असलेल्या कृषी आंदोलनाचा फायदा घेत आहे. दहशतवादाला पुरस्कृत करणाऱ्या इन्टर सर्विसेस इंटेलिजेंसतर्फे (आयएसआय) कट रचण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंजाबमार्गे चीनच्या ड्रोन्सद्वारे घातक हत्यारे आणि दहशतवादी साहित्य पाठवण्याचा मनसुबा चीनच्या मदतीने पाकने आखला होता.
 
 
 
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानंतर, दहशतवादविरोधी कारवाईशी संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. दहशतवादी संघटना आणि आयएसआय एकत्र येऊन हत्यारांची तस्करी करण्यासाठी आता अद्यावत ड्रोन यंत्रणा वापरत आहे. याचद्वारे अत्याधुनिक हत्यारे पाठवण्याची तयारी केली जात आहे. सध्या एलओसीवर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. त्याचा जिहादी दहशतवादी सामना करू शकलेले नाहीत.
 
 
 
त्यामुळे चीनने पाकिस्तानला ड्रोन पाठवले आहेत. यामुळे पंजाबमार्गे दहशत पसरवण्यासाठी सामग्री पाठवली जाईल. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांतर्फे सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या कारवायांमध्ये अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक विकासकामे सुरू झाली आहेत. त्यामुळे दहशतवादी हैराण करत आहे. मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात ते आहेत.
 
 
पाकिस्तानमध्ये असलेल्या खलिस्तानी दहशतवादी संघटनांचे म्होरके शेतकरी आंदोलनाचा फायदा घेऊन घातपात करण्याच्या तयारीत आहेत. शेतकरी आंदोलनात ज्या प्रकारे पंजाबच्या शेतकऱ्यांचा आक्रोश पहायला मिळाला त्यात अशा घातपातामुळे मोठ्या जमावाला लक्ष्य करून कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा कट रचला आहे. भारत चीन सीमा संघर्षात आता चीनही पाकची चाल खेळू लागला आहे. पाकला अत्याधुनिक ड्रोन पुरवत दहशतवाद्यांना मदत करू लागला आहे.
 
 
 
पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना आणि आयएसआय एकत्र येऊन घातपात घडवण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. पंजाबचा विचार केल्यास १२ ऑगस्ट २०१९ पासून आतापर्यंत विचार केल्यास आतापर्यंत चार चीनी ड्रोन्स जप्त करण्यात आले आहेत. याचा वापर केवळ हत्यारे सीमापार करण्यासाठी होत नसून भारतीय सैनिकांच्या विरोधात रणनिती आखण्यासाठी केला जाऊ शकतो.
 
 
 
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आदी बड्या नेत्यांसह एप्रिल २०२० मध्ये झालेल्या बैठकीत चीनी ड्रोन पाठवण्याचा विचार मांडण्यात आला होता. पीओके स्थित कोटली येथईल ब्रिगेड मुख्यालयात विचार-विमर्श करण्यात आला होता. भारतातर्फेही अँटी ड्रोन तंत्रज्ञान वापरण्याची सुरुवात केली जात आहे. बीएसएफतर्फे जूनमध्ये असाच एक ड्रोन पकडण्यात आला होता.



@@AUTHORINFO_V1@@