सिंधुदुर्गातील आंबोलीत गव्याची शिकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |
indian gaur _1  


शीर धडापासून केले वेगळे 

मुंबई (प्रतिनिधी) - आंबोलीजवळील चौकुळ रस्त्यावर रानगव्याची शिकार झाल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. शिकाऱ्यांनी गव्याचे इतर अवयव त्याठिकाणीच टाकले आणि केवळ मांस घेऊन त्याठिकाणाहूून पळ काढला. त्यामुळे मांसाच्या हव्यासापोटी ही शिकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 
 
 
आंबोलीतील 'मलाबार नेचर काॅन्झर्वेशन क्लब'च्या सदस्यांनी गव्याच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. आंबोली वनतापसणी नाक्यापासून काही मीटरवर असणाऱ्या चौकुल रस्त्यावर हा प्रकार घडला. क्लबचे सदस्य या रस्त्यावरुन जात असताना त्यांना या भागातील झाडे तोडल्याचं आढळून आले. त्यांनी जाऊन तपासणी केली असता, त्याठिकाणी त्यांना मृत गव्याच्या शरीराचे अवयव मिळाले. गव्याचे शीर धडापासून वेगळे करुन एक बाजूला, तर शेपटीखालचा भाग दुसरीकडे टाकण्यात आला होता. पोटातील आतड्या त्याचठिकाणी टाकण्यात आल्या. मात्र, चारही पाय आणि गव्याचे मांस गायब असल्याने केवळ मांसासाठी या गव्याची शिकार झाल्याचा अंदाज आंबोलीतील वन्यजीव अभ्यासक आणि मलबार 'नेचर काॅन्झर्वेशन ट्रस्ट'चे काका भिसे यांनी व्यक्त केला आहे. हा परिसर गोवा आणि कर्नाटकला लागूनच असल्याने परराज्यातील लोकांनीच गव्याची शिकार केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. शिकार झालेला गवा हा अंदाजे ४०० किलो वजनाचा मध्यम वयातील होता. 

@@AUTHORINFO_V1@@