कल्याण डोंबिवलीतील उंबर्ली टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |
                               
                      
                                          कल्याण डोंबिवलीतील उंबर्ली टेकडी अतिक्रमणांच्या विळख्यात
डोंबिवली : डोंबिवली परिसरातील मौजे, धामटण, दावडी, उंबार्ली, हेदुटणो भागात महाराष्ट्र वनविभागाच्या अखत्यारीतील वन आहे. त्यापैकी उंबर्ली पक्षी अभयारण्य हा शहराचा ऑक्सीजन झोन म्हणून ओळखला जातो. या जंगलावर सध्या माफियांच्या नजर पडली आहे. पर्यावरणाचा :हास थांबविण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरण मंत्री यांच्याकडे केली आहे.
 
 
उंबार्ली, हेदुटणो, दावडी या परिसरात विविध पक्षी, किटक, फुलपाखरे, साप, सरपटणारे प्राणी आणि विविध प्रकारची वृक्षसंपदा आहे. खाजगी संस्थाकडून वृक्षरोपण मोहीम राबविण्यात येते. या जंगलावर सध्या माफियांची सध्या नजर पडली आहे. बाजूलाच उंबार्ली येथे गृहनिर्माण प्रकल्पाच्या नावावर जंगलाचा :हास सुरू आहे. मोठेमोठे क्रशर व मशिनरी लावून खोदकाम सुरू आहे. तसेच दरवर्षी या जंगलाला आगी लावण्यात येतात. काही वेळा डोंगरावर रासायनिक पदार्थ टाकून निसर्गाची हानी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
 
 
मुंबईतील आरे जंगलाचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच कल्याण डोंबिवलीसाठी उंबार्ली आणइ परिसराचे आहे. जंगलाचे अस्तिव टिकवायचे असेल तर पर्यावरणपूरक प्रयत्न करण्याची गरज आहे. पर्यावरणासाठी धोकादायक ठरणा:या बाबींची चौकशी करण्याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी पर्यावरणमंत्री व वनमंत्री यांना पत्र देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
 
 
या जंगलाचे योग्य संवर्धन करायचे असेल पांडवलेण्याचा पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यान ट्रस्टच्या वतीने विकसित केले आहे. मनसेची नाशिकमध्ये सत्ता असताना हे वनोद्यान विकसित करण्यात आले. हे उद्यान पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक येतात आणि दरवर्षी लाखो रूपयांचे उत्पन्न महानगरपालिकेला मिळत आहे. त्याच धर्तीवर निसर्गाने नटलेल्या मौजे धामटण येथे बोटॅनिकल गार्डन बनविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी वनमंत्र्याकडे केली आहे. बोटॅनिकल गार्डन बनविण्यासाठी विविध कंपन्या सीएसआर फंड वापरण्यास तयार आहेत. फक्त शासनाने इच्छाशक्ती दाखवून गार्डन बनविण्याची परवानगी दिल्यास उत्कृष्ट गार्डन निर्माण होईल. पर्यावरण संवर्धन तसेच महानगरपालिकेला उत्पन्नाचे साधन होईल अशी मागणी करण्यात आली आहे. राजू पाटील यांनी पर्यावरणप्रेमींसोबत पर्यावरणास होत असलेल्या अडचणी जाणून घेत या परिसराला भेट दिली. यावेळी निसर्ग वाचवण्याच्या लढयात असलेले पर्यावरणप्रेमी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये अॅडव्हेंचर इंडिया, गिरीमित्र प्रतिष्ठान, निवासी विभाग प्रतिष्ठान, स्वयंम् चॅरिटेबल ट्रस्ट, के. वि. पेंढारकर कॉलेज माजी एनसीसी विद्यार्थी संघ, तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते.
 
 
---------------------------------------------------------
@@AUTHORINFO_V1@@