ठाणे शहराचा सुधारित विकास आराखडा दृष्टीपथात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |

thane_1  H x W:



उप संचालक नगररचना कार्यालयाचे स्थानांतरण ठाणे मनपात



ठाणे: ठाणे शहराचा सुधारित विकास आराखडा दृष्टीपथात असुन नविन वर्षात ठाणे महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून नव्या विकास योजनेच्या प्रक्रीयेला सुरूवात होण्याची शक्यता आहे. यासाठी अमरावती येथील विकास योजना तयार करण्याचे काम पुर्ण झाल्याने तेथील उप संचालक नगर रचना, विकास योजना विशेष घटक हे कार्यालय स्थलांतरीत होणार असुन राज्याच्या नगर विकास विभागाने हे कार्यालय ठाण्यात स्थलांतरीत करण्यास मंजुरी दिली आहे.


ठाणे नगरपरिषद आणि ३२ महसुली गावांचा समावेश करून १ ऑक्टोबर १९८२ रोजी ठाणे महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. परंतु ठाणे शहराचा विकास आराखडा १४ मे २००३ रोजी अस्तित्वात आला. विकास आराखडा अंमलात आल्यापासून वीस वर्षाच्या कालावधीमध्ये किंबहूना २० वर्ष पूर्ण होण्याच्या तीन वर्ष अगोदर त्याची फेरतपासणी आणि सुधारणा बंधनकारक आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या नगर रचना विभागाकडून नविन विकास योजनेच्या प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे.


सदर पार्श्वभूमीवर,मनपा आयुक्तांनी नुकतेच शासन दरबारी पत्र पाठवले होते. त्यानुसार,अमरावती येथील विकास योजना तयार करण्याचे काम पुर्ण झाल्याने तेथील उप संचालक नगर रचना, विकास योजना विशेष घटक हे कार्यालय ठाणे मनपामध्ये स्थलांतरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. यासाठी येणारा सर्व खर्च ठाणे महापालिकेदवारे करण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@