“माझी मुलगी देशविरोधी कारवायांमध्ये सामील”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |

Shehala Rashid_1 &nb
 
 
नवी दिल्ली : माझ्या मुलीचा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्यादेखील मिळाल्या असून त्यामुळेच आपण काश्मीरहून जम्मू येथे आलो आहोत. माझ्या मुलीला मिळणाऱ्या पैशाची आणि देशविरोधी कारवायांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेहला रशिद हिचे वडिले अब्दुल रशिद शोरा यांनी जम्मू – काश्मीरच्या पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे केली आहे.
 
 
 
जवाहरलाल नेहरु विद्यापीठामध्ये (जेएनयू) संसद हल्ल्यातील दहशतवादी अफजल गुरू याच्या समर्थनार्थ झालेल्या देशविरोधी कार्यक्रमापासून जेएनयू विद्यार्थी नेता शेहला रशिद चर्चेत आली होती. जेएनयूमध्ये झालेल्या त्या कार्यक्रमामध्ये भारत आणि भारतीय लष्कराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. शेहला रशिदसह कन्हैया कुमार आणि उमर खालिद कथित विद्यार्थी नेत्यांचाही त्यात समावेश होता. जेएनयूच्या त्या प्रकारानंतर शेहला रशिदने वारंवार देशविरोधी वक्तव्ये करणे, भारतीय लष्करावर खोटे आरोप करणे असे प्रकार केले आहेत.
 
 
 
आता शेहला रशिद हिचे वडिल अब्दुल रशिद शोरा यांनीच तिच्यावर देशविरोधा कारवायांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी केवळ आरोपच केले नाहीत, तर जम्मू – काश्मीरच्या पोलिस महासंचालकांना तसे पत्र लिहिले आहे. त्या पत्रात अब्दुल रशिद शोरा यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. अब्दुल रशिद यांच्या पत्रानुसार शेहला रशिद हिचा देशविरोधी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग आहे. त्यासाठी तिला मोठ्या प्रमाणावर पैसा पुरविला जात असून परदेशातून मिळणाऱ्या पैशाचाही त्यात समावेश आहे. या हालचालींना विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला धमक्या देण्यात आल्या आणि घर सोडून जाण्याचाही दबाव टाकण्यात आला. अब्दुल रशिद शोरा यांनी पत्रामध्ये आपल्या जिवाला धोका असून त्यामुळे पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणीदेखील पत्रामध्ये केली आहे.
 
 
दरम्यान, शेहला रशिद हिने आपल्या वडिलांच्या आरोपांचा इन्कार केला आहे. ट्विट करून तिने आपले वडिल आपल्या आईला मारहाण करायचे, त्यांच्याविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्या आरोपांना गांभिर्याने घेऊ नये, असे शेहला रशिदने म्हटले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@