दिवाळी आली तरी एसटी कामगार वेतनापासून वंचित, लाजिरवाणी गोष्ट!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

Ravindra Chavan_1 &n
 


रविंद्र चव्हाणांची राज्य सरकारवर टीका 




डोंबिवली  : एसटी कर्मचा:यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. दिवाळी जवळ आली असताना एसटी कामगारांना वेतन न मिळणो यासारखी लाजिरवाणी कोणताही गोष्ट नसल्याची टीका भाजप सरचिटणीस आणि आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. डोंबिवलीतील आजदे गावात अमृत योजनेतील विकासकामाचे भूमीपूजन आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी एस टी कर्मचा:यांच्या वेतनाबाबत राज्य सरकारवर टिका केली.
 
 
 
 
राज्य सरकारने एसटी कर्मचा:यांचे वेतन तात्काळ दिले पाहिजे. सरकार त्यांच्या आंदोलनाची वाट पाहत आहे का? दिवाळीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना ही गेल्या तीन महिन्यापासून एसटी कर्मचारी पगारापासून वंचित असून तो तातडीने करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे. आजदे गावातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. अनेकदा नळाला पाणी येत नाही.



पाणी आले तरी त्यांचा दाब कमी असतो. पाणी समस्येमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आपली व्यथा भाजपा नगरसेवक विनोद काळण यांच्याकडे मांडली. आजदे गावातील नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आजदे गावात आता अमृत योजनेतंर्गत नऊ लाख लीटर पाणी बसण्याची क्षमता असलेली टाकी बसविण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आला. विनोद काळण यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. जेणोकरून नागरिकांची पाण्याची समस्या लवकर दूर होईल असे विनोद काळण यांनी सांगितले. या कार्यक्रमाला भाजप नगरसेवक विनोद काळण, योगेश तळेकर, शेखर शिंदे, अश्विनी विनोद काळण आणि विवेक पोरजी उपस्थित होते.
@@AUTHORINFO_V1@@