एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस आणि वेतन मिळणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |
Anil Parab 11_1 &nbs
 
 


तासाभरात एका महिन्याचे वेतन जमा करण्याचे आश्वासन

 
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच बोनस देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारही सोबत देण्यात येणार आहे. तासाभरात एका महिन्याचा पगार देणार त्यानंतर दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचा पगार देणार आहोत, अशी घोषणा परिवाहनमंत्री अनिल परब यांनी केली. पत्रकार परिषद घेऊन परिवहन मंत्री अनिल परब यांनी ही माहिती दिली.
 
 
 
दिवाळीपूर्वी आणखी एका महिन्याचे वेतन, असे एकूण थकीत दोन महिन्यांचे वेतन दिले जाणार आहे. हे तात्पुरते संकट आहे, एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती अनिल परब यांनी केली. ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बोलणे सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली. सोमवारी एका तासात एक पगार व सणाची अग्रिम रक्कम देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
दरम्यान, या प्रकारावरून भाजपने अनिल परब यांच्यावर टीका केली होती. राज्य सरकारतर्फे मोठ्या रक्कमेची अपेक्षा परिवाहन मंडळाला आहे, त्यानंतर हा प्रश्न सुटेल कृपया आत्महत्या करू नका, असे आवाहन परब यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. दोन महिन्यांचा पगार आणि सानुग्रह अनुदान आजच देणार आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासनही परब यांनी दिले.
 
 
पगार आणि डिझेलावर उत्पन्न खर्च
 
राज्य परिवाहन महामंडळ उपक्रमाअंतर्गत सुरू असलेल्या एसटीवर मोठे आर्थिक संकट आले आहे. उत्पन्नातून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार आणि डिझेल यातच सर्व खर्च होत आहे. यातून सावरण्यासाठी सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री व उर्जा मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा सुरू आहे, अशी माहिती परब यांनी दिली.
 
 

एसटी कर्मचाऱ्यांचा ‘आक्रोश’
 
 
एसटी कर्मचाऱ्यांचा आत्महत्या प्रकरणांमुळे संताप अनावर झाला आहे. एसटी कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. दिवाळीपूर्वी सर्व थकीत वेतन आणि अग्रीम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. ऐन दिवाळसणाच्या पूर्वी कर्मचाऱ्यांना हक्काच्या वेतनासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागले आहे. एसटी कर्मचारी कोरोना काळात अविरत सेवा बजावत आहेत. या काळात अनेकांवर ताण येत होता तरीही ते डगमगले नाहीत. अनेकांना कोरोनाची बाधा झाली, अनेकांनी आपला जीव गमावला परंतू सेवा देण्याचे कार्य त्यांनी सुरू ठेवले. अशा महामारी काळात घरखर्च व आरोग्य उपचारासाठी घरात जमापूंजी असणे आवश्यक असतानाच वेतनाला कात्री लावण्याचे काम महामंडळ करत आहे, याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
महामंडळासाठी दोन हजार कोटींची मागणी
 
 
प्रलंबित वेतनासाठी ९ नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहेत. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन द्यावे. एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.


@@AUTHORINFO_V1@@