आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

immunity_1  H x



होमियोपॅथीच्या उपचारांना आहार, विहार, आचार व विचार यांची चांगल्याप्रकारे साथ लाभली, तर प्रत्येक माणूस हा आरोग्यदायी जीवन जगू शकतो. थोडक्यात काय, तर सकारात्मक जीवनशैली व होमियोपॅथीचे उपचार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपले जीवन आरोग्यदायी बनविण्यासाठी आपण आता आपली जीवनशैली कशी बदलायची ते बघूया.



कोरोना विषाणूच्या या महासाथीमध्ये लोकांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने वाढीस लागली व ती म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी केली जाणारी धडपड, नुसते व्हिटामिन्स किंवा टॉनिक्स पिऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढत नाही, तर संपूर्ण जीवनशैलीमध्ये व विचारांमध्ये सकारात्मक बदल केला, तरच ही रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. आपल्या आरोग्याची खबरदारी ही आपली आपल्यालाच घ्यायला पाहिजे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्यामागचे मुख्य कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. बदलेली जीवनशैली जर पुन्हा रुळावर आणायची असेल तर माणसाने मुख्यत्वे आहार, विहार, आचार आणि विचार यांचा नीट अभ्यासपूर्ण उपयोग करून घ्यायचा आहे. होमियोपॅथी व तिचे उपचार हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतातच; परंतु या होमियोपॅथीच्या उपचारांना आहार, विहार, आचार व विचार यांची चांगल्याप्रकारे साथ लाभली, तर प्रत्येक माणूस हा आरोग्यदायी जीवन जगू शकतो. थोडक्यात काय, तर सकारात्मक जीवनशैली व होमियोपॅथीचे उपचार हीच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आपले जीवन आरोग्यदायी बनविण्यासाठी आपण आता आपली जीवनशैली कशी बदलायची ते बघूया.


यात आपण सर्वप्रथम अभ्यासणार आहोत तो म्हणजे आहार. आहार आणि आरोग्य याचा सरळ संबंध आहे. माणूस जे सेवन करतो, त्याच्या हिशोबानेच त्याचे आरोग्य बनत असते. हल्ली आपल्या आजूबाजूला चमचमीत, मसालेदार, अत्यंत आकर्षक असे खाद्यपदार्थ दिसून येतात. एवढेच नव्हे, तर बरेचसे खेळाडू, कलाकार किंवा इतर सेलिब्रिटी मंडळी टीव्ही व इतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची व पेयांची जाहिरात करत असतात, यापैकी बरेचसे पदार्थ हे स्वस्त वाटले किंवा सरकारमान्य वगैरे जरी वाटले तरी प्रत्यक्षात मात्र आरोग्याला अपायकारक असे असतात.


आपल्या देशाच्या मातीत उत्पन्न होणारे देशी धान्य, कडधान्ये, फळे व भाज्या यांच्या योग्य उपयोगापासून अनेक लोक आज वंचित आहेत व फक्त जाहिरातींना बळी पडून ओट्स किंवा मुसली सारखे पदार्थ खाण्यात आणून लोक आपले आरोग्य पणाला लावत आहेत. परदेशी खाणे हे आपल्या मातीतील लोकांना कितपत फायदेशीर आहे, याचा कधीही हे लोक विचार करत नाहीत. गेल्या काही वर्षांत आपण असे म्हणतो की, वैद्यकीय शाखेने खूप सारी प्रगती केली आहे. रोगाचे निदान करण्यासाठी विविध प्रकारची यंत्रे व यंत्रणा उपलब्ध आहेत, खूप आधुनिक अशी उपचार पद्धती व मॉडर्न औषधे उपलब्ध आहेत. परंतु, तुम्ही या गोष्टीचा विचार केला का की, औषधशास्त्र प्रगत झाले, विविध रासायनिक व अनैसर्गिक औषधे, औषध कंपन्यांनी लोकांच्या माथी मारली. परंतु, इतक्या वर्षांत आजारी लोकांचे प्रमाण काही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस नवनवीन आजार येत आहेत व जगभरात रुग्णांची संख्या वाढतच आहे. या मॉर्डन वैद्यकशास्त्रामुळे आजारांना आळा घालण्यात पूर्णपणे अपयश आलेले आहे. असो, आहाराच्या बाबतीत आपण कसे जागृत राहावे, हे आपण आता पुढील भागात पाहूया.


- डॉ. मंदार पाटकर
@@AUTHORINFO_V1@@