चिठ्ठीत 'ठाकरे' नाव लिहून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |
ST_1  H x W: 0


जळगाव : स्वतःला कुटूंबप्रमुख म्हणवून घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारला जबाबदार धरत एसटी महामंडळाच्या एका वाहकाने आत्महत्या केली. 'माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि 'ठाकरे सरकार' जबाबदार आहे, अशी चिठ्ठी लिहून त्या कर्मचाऱ्याने दिवाळीच्या पूर्वीच आपले जीवन संपवले आहे. कोरोना काळापासून एसटी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना चार महिने पगारही मिळालेला नाही.
 
 
 
चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने घरात खायचे काय, असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांपुढे आहे. ऐन दिवाळी सणाच्या आठवडाभर आधीच जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी एसटी कर्मचारी मनोज चौधरी यांनी आपले जीवन संपवले आहे. राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू असताना अशी धक्कादायक घटना उघड झाल्याने संतापाचे वातावरण आहे.
 
 
राज्य परिवाहन महामंडळातील कमी वेतन, अनियमित कारभार आणि 'ठाकरे' सरकार या गोष्टी माझ्या आत्महत्येला जबाबदार आहेत, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे. माझ्या आत्महत्येला मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) जबाबदार आहे, असा थेट आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. 'यात माझ्या घरच्यांचा काहीही संबंध नाही. कर्मचारी संघटनांनी माझा पीएफ आणि एलआयसी कुटूंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, अशी मी विनंती करतो आहे.'
 
 
पोलीस गुन्हा दाखल करण्याची हिंमत करणार का ? : निलेश राणे
 
 
"पोलीसांनी हिंमत दाखवावी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर SEC 306 अंतर्गत गुन्हा नोंदवावा. एसटी कामगार तडफडत आपला जीव देत आहे, या सरकारला त्यांच्या जीवाची काही पडलेली नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या एसटी बसेस गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या कराव्यात मग बघा प्रश्न सुटतो की नाही," असे आवाहन माजी खासदार निलेश राणे यांनी राज्यातील कर्मचाऱ्यांना केले आहे.
 
 
रत्नागिरीत आणखी एका कर्मचाऱ्याने संपविले जीवन
 
 
रत्नागिरी एसटी महामंडळ बस आगारात एका बस वाहकाने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे राज्यभरात संतापाचे वातापरण आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे, असे या बस वाहकाचे नाव आहे. पांडुरंग गडदे हे रत्नागिरी एसटी बस आगारात सेवेत होते. ८ नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी, अशी नियोजित फेरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशोब दिला. त्यानंतर आगारात खोलीत जाऊन झोपी गेले ते कायमचेच.
 
 
 
दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांचे सहकारी पी. ए. तांदळे त्यांना उठवण्यासाठी गेले. खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तांदळे यांचा संशय बळावला. तांदळेंनी दार तोडून आत प्रवेश केला व गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती आगार नियंत्रक रमेश केळकर यांना देण्यात आली.



Suicided Note_1 &nbs
@@AUTHORINFO_V1@@