अखेर ६ दिवसांनंतर शिरूर प्रकरणातील आरोपी ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

Shirur_1  H x W
पुणे : पुण्यातील शिरूरमधील न्हावरे गावामध्ये एका महिलेवर बळजबरी करून तिच्यावर हल्ला करण्यात आला. यानंतर तिचे दोन्ही डोळे निकामी करून आरोपींनी गावाबाहेर पळ काढला होता. आता अखेर ६ दिवसानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे.
 
 
 
प्राणघातक हल्ला झालेली पीडित महिला ३७ वर्षांची असून पतीसोबत न्हावरे गावात पत्र्याच्या खोलीत वास्तव्यास होती. ३ नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास घराच्या आजूबाजूलाच शौचालयास गेल्यानंतर बाजूच्या झुडूपात दबा धरून बसलेल्या अज्ञात व्यक्तीने महिलेची छेड काढली. यावेळी महिलेने प्रतिहल्ला केल्यानंतर संतप्त व्यक्तीने महिलेवर हल्ला करत तिचे दोन्ही डोळे निकामी केले. यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता.
 
 
 
नराधमाने महिलेवर प्राणघातक हल्ला करत धारदार हत्याराने दोन्ही डोळे निकामी केले. यावेळी महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिचा पती व शेजारील नागरिक मदतीसाठी धावत आले. यानंतर हल्लेखोर फरार झाला. या हल्ल्यामध्ये पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या आठवड्यात बुधवारी तिच्या डोळ्यांचे ऑपरेशन करण्यात आले होते.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@