यंदाची भाऊबीज ऑनलाईन करा ; पालिकेचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

bhaubij_1  H x
 
 
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये अनेक गोष्टींवर राज्य सरकारने निर्बंध घातलेले आहेत. दिवाळीच्या दिवसात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इमारतीच्या आवारात शोभेचे फटाके लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच, यंदाची भाऊबीजही ऑनलाईन करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
 
कोरोनामुळे सर्वधर्मीयांच्या प्रत्येक सणावर विरजण पडले आहे. पुढील दोन दिवसांत दिवाळीला सुरुवात होत असून यंदाच्या दिवाळीत फटाचे फोडण्याच्या आनंदावरही विरजण पडले आहे. केवळ लक्ष्मीपूजनच्या दिवशी खासगी आवारात फुलझडी (फूलबाजे) व आनार लावण्यास मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने नियमावली जाहीर केली असून यंदाची दिवाळी सजगतेने व सतर्क राहून साजरी करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण’ अशी ओळख असणारी ‘दीपावली’ आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाच्या दिवाळीत नागरिकांनी ‘कोविड’ प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे असून संसर्ग टाळण्यासाठी अधिकाधिक काळजी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. फटाक्यांच्या धुराचा 'कोविड - १९' बाधित रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी पालिका क्षेत्रात फटाके फोडणे किंवा आतषबाजी करणे यावर बंदी घातली आहे. दिवाळीच्या काळात फराळासाठी नातेवाइकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा दूरध्वनीद्वारे किंवा व्हिडीओ कॉन्फरनसिंगद्वारे द्याव्यात. भाऊबीजेच्या दिवशीही बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो ऑनलाईन ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.
 
सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतषबाजी कुठेही करता येणार नाही. हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यावसायिक परिसर, विविध समूह इत्यादी आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडून उल्लंघन केल्यास पालिका आणि पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@