'ठाकरे सरकारविरोधात ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

praveen darekr_1 &nb


मुंबई :
गेल्या दोन विधानपरिषद दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे, असा हल्लाबोल विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे कर्मचा-यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, असंही प्रवीण दरेकरांनी सांगितलं आहे. भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी आज माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.




गेल्या दोन दिवसात एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी करतानाच कर्मचा-यांचे थकित पगार दिवाळीपूर्वी द्या अन्यथा भाजपाच्यावतीने टोकाची भूमिका घेण्यात येईल, असा जोरदार इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला आहे. या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील  केला आहे. दिवाळीत बोनस तर सोडाच पण पगारही नाही ही गंभीर बाब आहे. केंद्राने जसं पॅकेज दिलं राज्याने तसं पॅकेज दिलं असते तर अशी वेळ आली नसती.



दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी डेपोत काम करणाऱ्या एका एसटी चालकाचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळला आहे. या एसटी चालकाने पगार मिळत नसल्यानं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. प्रलंबित वेतनासाठी आज ९ नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहेत.कोरोनाच्या काळापासून एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांना चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने अनेकांची आर्थिक परिस्थिती ढासळली असल्याचं पाहायला मिळत आहे. वेतन न मिळाल्यानं जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी आणि जळगाव एसटी महामंडळात वाहक पदावर काम करत असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहिलेल्या चिठीत एस टी महामंडळ आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.
@@AUTHORINFO_V1@@