नरकासूरामुळे विठ्ठल बंदीवासात! मग कसली दिवाळी ?

    08-Nov-2020
Total Views |

Bandatatya _1  
 
 



बंडातात्या कराडकर यांचा मुख्यमंत्र्यांवर पत्रातून 'वार'

मुंबई : दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे. देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला विचारला आहे.
 
 
पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार सुरू आहेत. मग मंदिरे बंद का, असा संतप्त सवाल त्यांनी विचारला आहे. लॉकडाऊननंतर पुनश्च हरि ओम म्हणत सरकारने नव्या जोमात सुरुवात केली. मात्र, 'हरि' बंदीवासातच राहीला, अशी टीका मनसेनेही केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर मुख्यमंत्री फेसबूक लाईव्हवर जनतेशी संवाद साधण्यासाठी आले. मात्र, देऊळे सुरू कधी करणार याचे उत्तर त्यांनी बघू, पाहू दिवाळीनंतर नियमावली करून सुरू करू, असे दिल्याने वारकरी संप्रदायामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
 
 
महाराष्ट्राच्या नरकासुराने राज्यातील मंदिरे बंद करून ठेवल्याने यंदा दिवाळी साजरी करू नये. करायचेच झाल्यास त्यांच्या नावे ‘शिमगा’ करा तसेच आंघोळ करायची आणि गोड खायचे असेल तर या अधर्मी, नास्तिक असुरांचे चौदावे घालत खा, असे आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.
 
 
 
त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलेले आव्हान पुढील प्रमाणे...
 
 

Bandatatya _2