‘कॉमन कोरोना-१९’ कडे वाटचाल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

covid_1  H x W:



कोरोनाचा झपाट्याने होऊ शकणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरांवरील कामांवर बंदी आणण्याची आवश्यकता होती. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी दुकाने, कार्यालये, कारखाने, प्रवास, वाहतूक सर्वच बंद करण्याचा निर्णय केवळ आपल्या देशातच नव्हे, तर इतरही देशांनी अमलात आणला. प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली. त्यांचे परिणामही लक्षात येत आहेत.



मार्च २०२०पासून ‘कोविड-१९’ विषाणूने जगात हाहाःकार माजविला. लगेचच त्याने जागतिक स्तरावरील महामारीचे स्वरूप धारण केले. तेव्हापासून गेले आठ महिने सर्व माध्यमांमधून कोरोनाविषयक बातम्यांनी जो अग्रक्रम घेतला, तो तसाच सुरू आहे. पहिल्या काही दिवसांत फार मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यांची दवाखान्यांमधून भरती करताना सर्वच स्तरांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दवाखान्यांमधून खाटा, श्वासप्रेरक यंत्रे, काही ठरावीक औषधे इत्यादींची फार कमतरता जाणवत होती. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर तात्पुरत्या निवासांची झपाट्याने निर्मिती, उपचार करणार्‍या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी संरक्षक पोषाख उत्पादन इ. गोष्टींची उपलब्धता आणि कितीतरी गोष्टी तातडीने पुरविण्याच्या व्यवस्था करण्यात आल्या. एकजात आपल्या सर्वांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक झालेली वस्तू मुखावरण - ’Mask' आहे. आजच्या घटकेला देश-विदेशातही लोक जाणीवपूर्वक मुखावरण घालून फिरत आहेत. केवळ दोन-तीन महिन्यांत जागतिकस्तरावर हा अभूतपूर्व बदल कोरोनाने घडवून आणला. दरम्यान सर्वत्र जनतेला पूर्णपणे संकटात टाकणारी गोष्ट घडली. कोरोनाचा झपाट्याने होऊ शकणारा संसर्ग टाळण्यासाठी सर्वच स्तरांवरील कामांवर बंदी आणण्याची आवश्यकता होती. लोकांनी एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी दुकाने, कार्यालये, कारखाने, प्रवास, वाहतूक सर्वच बंद करण्याचा निर्णय केवळ आपल्या देशातच नव्हे, तर इतरही देशांनी अमलात आणला. प्रत्येक देशाने आपापल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी केली. त्यांचे परिणामही लक्षात येत आहेत.



या सर्वात सर्वांनाच भयंकर त्रासदायक ठरणारी गोष्ट विलगीकरणाची होती. एखाद्या व्यक्तीस कोरोना होताच त्याच्यासकट त्याचे कुटुंब आणि संपर्कात आलेले सर्वच लोक कधी आपण होऊन, तर कधी बळजबरीने विलगीकरण केंद्रांत भरती केले जात. प्रारंभी केंद्रात पुरते लक्ष देता न आल्याने श्वासोच्छ्वास बंद पडत शेवटच्या घटका मोजणार्‍या काही कोरोना पीडितांची हृदयद्रावक चित्रणे प्रसारित झाली. त्यामुळे समाजात एक प्रकारे कोरोनाची दहशत निर्माण झाली. पटापट मरणार्‍यांचे आकडे, त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी अंत्यसंस्कार करण्यास असमर्थता दाखविणे, अशा समाजाला धक्का देणार्‍या गोष्टीही समोर आल्या. कोरोना संसर्ग होऊन विलगीकरण कक्षात भरती होणे म्हणजे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश घेण्यासारखे झाले. त्यातूनच आजार लपवून ठेवणे, तब्येत अधिकच बिघडल्यावर धावपळ करणे, याही गोष्टी घडत होत्या. पुढे जाऊन एखाद्या सहनिवासात कोरोनाचा रोगी सापडला, तर पूर्ण इमारतच संसर्गापासून दूर ठेवण्याचे धोरण अवलंबिले गेले. याच दरम्यान कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्यावर जगात अनेक ठिकाणी युद्धपातळीवर संशोधन प्रकल्प घेण्यात आले. आता त्या प्रगत झालेल्या लसींच्या मानवांवर चाचण्या सुरू होण्यापर्यंत प्रगती झाली आहे.

कोरोनाचे नवे आकलन


मानवजात अनुभवांतून शिकत आली आहे. कोरोनावर लस उपलब्ध झाली नसली, तरी साधारणपणे अ‍ॅन्टिबायॉटिक देण्यास सुरुवात झाली. सोबत क्लोरोक्विन गोळ्या आणि प्लाझ्मा अभिसरण आले. त्यांच्या उपयुक्ततेबद्दल शंका-कुशंका उपस्थित झाल्यात. या सर्व उलथापालथीतून संपूर्ण मानवजात बरेच काही शिकते आहे. कोरोना झालेली प्रत्येकच व्यक्ती मृत्युमुखी पडते असे नाही. 95 टक्क्यांपर्यंत लोक बरे होतात. विलगीकरण सर्वच स्तरावर आवश्यक असले तरी घरातच विलगीकरण करणे, हे आता शासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य लोकांनी स्वीकारले आणि अंगवळणी पाडून घेतले. आता पूर्णच्या पूर्ण सहनिवास इमारत वाळीत टाकल्यासारखी विलगीकरणात न टाकता, केवळ ज्या कुटुंबात संसर्ग झालेली व्यक्ती असेल त्यालाच विलगीकरणात ठेवण्याची मानसिकता आली आहे. बोलणे आणि श्वासोच्छ्वासातून कोरोनाची लागण होऊ शकते, हे लक्षात घेऊन तोंडावर मुखावरण चढवून आपले नेहमीचे व्यवहार करण्यास लोक सरावले आहेत. गेल्या पाच, सहा महिन्यांत धान्य, भाजीपाला, दूध, औषधे इ.चा तुटवडा जाणवला नाही, ही मोठी जमेची बाजू आहे.


‘कॉमन कोरोना’


सर्दीवर उपाय म्हणजे, दोन दिवस आराम करणे. सहृदयी डॉक्टर कुठलेही औषध देत नाहीत. आपलाही नेहमीचा तो अनुभव असतो. अशा सर्दीला ‘कॉमन कोल्ड’ नेहमीचे सर्दी-पडसे म्हणतात. अनेक कोरोना रुग्णांचा अनुभव पाहता, कोरोनाच्या बाबतीत तसेच घडताना दिसते आहे. कोरोना झालेली व्यक्ती तपासणी करून घेण्यास गेल्यावर स्वत:ला वेगळे करते. दिलेली औषधे घेते. आपोआपच आराम होतो. या दरम्यान गरम अथवा कोमट पाणी पितात. कोरोना गेल्याची खात्री झाल्यावर काही दिवस विलगीकरणाचे बंधन पाळते. इतर लोकही दोन हात दूर राहतात. अनेकांनी असेही सांगितले की, सर्दी अथवा घशात त्रास सुरुवात वाटल्याबरोबर त्यांनी स्वत:चे विलगीकरण केले. आराम केला आणि औषध न घेता आठ-दहा दिवसांनंतर बरे वाटले. त्यांची तपासणी केल्यावर कोरोना होऊन गेल्याचे कळले. हे ‘कॉमन कोल्ड’ प्रमाणेच झाले. कोरोना सर्वांनाच पीडा देत नाही. जे दुर्लक्ष करतात त्यांना तो भोवतो. त्याची उदाहरणे आहेत. सर्दी-पडशाबाबत आणि कोणत्याही व्याधीचा वेळेवर उपचार झाला नाही तरी तेच घडते. कुणाला सर्दी झाली असल्यास आपणही अंतर ठेवतो.


आताच्या परिस्थितीत थोडी जरी कोरोनाची शंका वाटली तरी विलगीकरणात जावे. डॉक्टरांना दाखवावे. औषधे बरोबर घ्यावीत. कोरोनाचे महत्त्वाचे आणि अगदी पहिले लक्षण तोंडाची चव जाणे आहे. त्याच वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा. दुसरे लक्षण रक्तातील ऑक्सिजन कमी होणे हे आहे. ते एका छोट्या उपकरणाने सहज तपासता येते. ते तपासत राहून फार कमी होण्यापूर्वीच ऑक्सिजन पुरवठ्याची व्यवस्था केल्यास पुढची तारांबळ टाळता येईल. सर्वसाधारणपणे ऑक्सिजन ९०च्या वर पाहिजे. प्रतिबंधक उपाय म्हणून आळस झटकून दररोज नियमितपणे योगासने आणि प्राणायाम करण्याने संसर्गाच्या प्रादुर्भावाची तीव्रता कमी होऊ शकेल. यथावकाश सामाजिक स्तरावर आपोआपच रोगप्रतिकारकशक्ती निर्माण होत असते. पुणेकरांनी त्यांच्या तर्‍हेने वागून ते सिद्ध केले. कारण, एका पाहणीत जवळपास ५८ टक्के पुणेकरांमध्ये अ‍ॅन्टिजेन आढळले. हे एक प्रकारे सुलक्षण आहे. ‘कॉमन कोल्ड’प्रमाणे काही महिन्यांत ‘कॉमन कोविड-१९’ असे निदान होऊ लागले, तर आश्चर्य वाटायला नको. ‘कोविड-१९’ची लक्षणे दिसताच धीर सोडून उपयोग नाही. ज्यांना रक्तशर्करा अथवा रक्तदाब इत्यादीचा त्रास आहे, त्यांनी अधिक काळजी घ्यावी. पूर्णपणे सुरक्षित कारण येईपर्यंत सगळ्यांनी स्वत:ला जपायला हवे. मानवी समूहाने पूर्वी अशी अनेक संकटे झेलली आहेत. आता कोरोनाच्या संकटाला ‘कॉमन कोविड-१९’ स्वरूपात आणून आपण सामोरे जाऊ.


- डॉ. प्रमोद पाठक
@@AUTHORINFO_V1@@