मराठा आंदोलकांविरोधात सरकारची दडपशाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

Maratha Kranti Morcha_1&n
मुंबई : मराठा आंदोलन दिवसेंदिवस अधिक बळकट होत असताना सरकारने त्यांच्याविराधात दडपशाहीचा मार्ग अवलंबला आहे. मात्र सरकारच्या दडपशाहीमुळे मराठ्यांची एकजूट अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त करत मराठा क्रांती मोर्चा, महामुंबईतर्फे सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
 
 
मराठा क्रांती मोर्चातर्फे रविवार १ नोव्हेंबर रोजी मराठा जोडो अभियान संघर्षयात्रेला सुरुवात झाली. पूर्व उपनगरात अभियान राबवल्यानंतर ८ नोव्हेंबरपासून मुंबई आणि पश्चिम उपनगरात हे अभियान राबवण्यात येत आहे. त्याची माहिती देण्यासाठी मुंबई मराठी संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत सावंत आणि अभिजित पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी मराठा आंदोलकांवर सरकारतर्फे करण्यात येत असलेल्या दडपशाहीची माहिती दिली.
 
 
प्रशांत सावंत म्हणाले की, पंढरपुरातून आज मराठ्यांचा आक्रोश मोर्चा सुरू होत असतानाच सरकारने दडपशाहीची भूमिका घेतली आहे. कोरोनाचे कारण देत आंदोलकांना घरातून उचलले जात आहे. त्यांना डांबून ठेवण्यात येत आहे. पण कोरोना अजून एक-दोन महिने असेल. त्यानंतर मात्र मराठा उसळून उठेल, असा निर्धार प्रशांत सावंत यांनी व्यक्त केला.
 
 
मराठा जोडो अभियाना संघर्ष यात्रेविषयी बोलताना अभिजित पाटील म्हणाले की, उद्या सकाळी वरळी जम्बोरी मैदान येथून सकाळी मराठा जोडो संघर्षयात्रा सुरू होईल. नंतर दादर, वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, मालाड मार्गे संघर्ष यात्रेचा दहिसर येथे समरोप होईल. दहिसर येथे समन्वय व कार्यकर्त्यांची सभा होऊन मराठा आरक्षणाची सद्यस्थिती, राज्य सरकारची अनास्था आणि त्याबाबत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असे अभिजित पाटील यांनी सांगितले. सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत पावले उचलावीत, अन्यथा मराठा समाज आता शांत बसणार नाही, असा इशारा देतानाच मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांकडून होणाऱ्या बेताल वक्तव्यांचाही यावेळी निषेध करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@