पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन ; भारतीय सैन्याकडून चोख उत्तर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

LOC_1  H x W: 0
 
जम्मू काश्मीर : सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून पाकिस्तानने शनिवारी युद्धबंदीचे उल्लंघन केले. जम्मू-काश्मीरच्या पुंछ आणि कठुआ जिल्ह्यांतील नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या गावामध्ये पाकिस्तानी सैन्याने गोळीबार व तोफांचा मारा केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "माणकोट सेक्टरमध्ये पहाटे अडीचच्या सुमारास पुंछ जिल्ह्यातील एलओसीवर गोळीबार व तोफांचा मारा करण्यात आला. तसेच हीरानगर सेक्टरमध्ये रात्री गोळीबार सुरू होता. या गोळीबारात भारताच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नाही. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहाटे चारच्या सुमारास दोन्ही बाजूंनी गोळीबार थांबला.
 
 
यापूर्वी पाकिस्तानी सैनिकांनी शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास करोल कृष्णा, सतपाल आणि गुरनाम येथे देखील गोळीबार केला. याला भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांकडून कडक प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून गोळीबार सकाळी पाच वाजता थांबला. या गोळीबारात सीमाभागात राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरल्यामुळे त्यांनी रात्र भूमिगत बंकरमध्ये घालविली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@