"स्वतःच्या मंत्र्यांना मुख्यमंत्री वेळ देत नाहीत, मग सामन्यांच काय?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Nov-2020
Total Views |

Nilesh Rane_1  
 
मुंबई : शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी नुकतेच विविध प्रश्न मांडण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वेळ न मिळाल्याने थेट राज्यपालांची भेट घेतल्याचे सांगितले गेले. यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी टीका करत 'जे स्वतःच्या नेत्याला वेळ देत नाहीत, त्यात सामान्य नागरिकांचे काय?' अशी टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे की, "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ५० फोन करून सुद्धा फोन उचलत नाही आणि भेटत नाही, अशी एका शिवसेना आमदाराची तक्रार आहे. एका शिवसेना आमदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य शिवसैनिकांची अवस्था किती बिकट असेल यावरून लक्षात येते. त्यांनी फक्त भाषणातून सांगायचे शिवसैनिक माझा श्वास आहे नंतर शिवसैनिकांना फाट्यावर मारायचे." अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे.
 
 
 
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी 'कुठल्याही नेत्याने मुख्यमंत्र्यांना डावलून थेट राज्यपालांना भेटणे हे अपमानजनक आहे.' असे वक्तव्य केले होते. मात्र, आता शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यापालांचीच भेट घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावर तिवारी यांनी सांगितले की, "विदर्भाच्या प्रश्नासाठी मी राज्यपालांना भेटलो असून विशेषाधिकार वापरत त्यांनी विदर्भ - मराठवाड्याला न्याय द्यावा." अशी मागणी केली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@