WhatsApp Payment: आजपासून सुरू, वाचा कशी मिळणार सेवा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

whatsApp_1  H x


कॅलिफोर्निया : व्हॉट्सएपतर्फे ६ नोव्हेंबर २०२० पासून देशभरात पेमेंट सेवा सुरू केली आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियातर्फे गुरुवारी सायंकाळी व्हॉट्सएपला युपीआय बेस्ड् पेमेंट सेवा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. व्हॉट्सएप ही फेसबूकची सब्सिडियरी कंपनी आहे.
 
 
१० भाषांमध्ये उपलब्ध होणार पेमेंट सेवा
 
NPCI ची मंजूरी मिळाल्यानंतर फेसबूकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी एका व्हीडिओद्वारे माहिती दिली. व्हॉट्सएपद्वारे दहा स्थानिक भाषांमध्ये व्यवहार केले जाऊ शकतात. यावर कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. भारतात एकूण व्हॉट्सएपचे ४० कोटी ग्राहक आहेत. दोन वर्षांपासून ही सेवा प्रलंबित होती. व्हॉट्सएपतर्फे १० लाख ग्राहकांनी प्रायोगिक तत्वावर ही सेवा वापरली आहे.
 
 
१४० बँकांचे ग्राहक घेणार ही सेवा
 
झुकरबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १४० बँकांचे ग्राहक व्हॉट्सएप इच्छीतांना पेमेंट करू शकणार आहेत. व्हॉट्सएप पेमेंट हे पूर्णपणे सुरक्षित आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. व्हॉट्सएपद्वारे पेमेंट करण्यासाठी केवळ UPI शी संलग्न डेबिट कार्डची आवश्यकता आहे. त्याद्वारे सरळ व्यवहार उपलब्ध होतील. यावर लवकरच अपडेट्सद्वारे नवे फिचर्स उपलब्ध होतील. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिओ पेमेंट्स बँक आदी कंपन्यांशी भागिदारी करण्यात आली आहे.
 
२ कोटी ग्राहकांद्वारे केला शुभारंभ
 
NPCI तर्फे देण्यात आलेल्या निर्देशानुसार व्हॉट्सएप पेमेंट सेवेची सुरुवात दोन कोटी युझर्सद्वारे केली जाऊ शकते. देशात UPI द्वारे व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ऑक्टोबर महिन्यात UPI व्यवहारांची संख्या २.०७ इतकी झाली होती. सप्टेंबर महिन्यात युपीआयद्वारे एकूण १.८ दशलक्ष व्यवहार झाले होते. देशात रिटेल पेमेंट एण्ड सेटलमेंट सिस्टम व्यवहारात आणण्यासाठी NPCI या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. व्हॉट्सएप पेमेंट सेवा हळूहळू रोलआउट केली जात आहे. NPCIच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच ग्राहकांना या सेवेचा लाभ देण्यात येणार आहे. सुरुवातीला सर्वांनाच याचा अपडेट मिळणार नाही.
 
@@AUTHORINFO_V1@@