#Tweet4Bharat स्पर्धेला देशभरातून तूफान प्रतिसाद

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |
MahaMTB_1  H x



#Tweet4Bharat स्पर्धेतील मराठी भाषेतील निकाल

 
 
मुंबई : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे (RMP) ऑगस्ट महिन्यात महाMTB, ऑप इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने #Tweet4Bharat नामक पहिली ट्विटर थ्रेड स्पर्धा सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यावर ट्विट करण्याची स्पर्धा घेण्यात आली. ज्यात सर्वोत्कृष्ट ट्विटला विषयानुसार पुरस्कार जाहीर करण्यात आले.
 
 




MARATHI- GENDER EQUALITY_

 
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे १९८२ पासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. “#Tweet4Bharat” च्या माध्यमातून तरुणांना ट्विटर थ्रेड्स’वापरून इतरांनाही राष्ट्रहीताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील हिंदी आणि इंग्रजी विजेत्यांची ऑप इंडियावर प्रकाशित करण्यात आली आहेत.
 


MARATHI- SOCIAL JUSTICE_1
 
 
शॉर्ट ब्लॉगिंग साईट म्हणून ट्विटरची ओळख आहे. अशाच ट्विट थ्रेडच्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या ब्लॉगर्सना व्यक्त होण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे #Tweet4Bharat या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी स्पर्धक हिंदी, इंग्लिश किंवा मराठी या तीन भाषेतून स्पर्धकांना व्यक्त होण्याची संधी मिळाली होती.
 



MARATHI- GENDER EQUALITY_
 
 
१. राष्ट्रीय एकात्मता, २. सामाजिक न्याय, ३. स्त्री-पुरुष समानता या तीन विषयांची या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. स्पर्धेचा कालावधी १ ऑगस्ट ते १० ऑगस्ट असा असेल. सर्व ट्विट्स तसेच त्यावर आलेल्या प्रतिक्रिया व रिट्विट यावरून स्पर्धेतील विजेते ठरविण्यात आले. 





Marathi Tweet_1 &nbs
 
 
अशाप्रकारे तीन भाषांमध्ये मिळून एकूण २७ पारितोषिकं देण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक नगदी पारितोषिकांसोबतच एका उच्चस्तरिय राष्ट्रीय संमेलनामध्ये सहभागी होऊन त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळणार आहे. हे संमेलन स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १४ ऑगस्टला आयोजित करण्यात आले.
 
 
 
 
विजेत्यांसाठी लॉकडाऊन संपल्यानंतर रामभाऊ म्हाळगीं प्रबोधिनीच्या दोन दिवसांच्या भेटीचे नियोजन देखील करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाठवले जाईल. यातील ९ विजेते ट्विट हे मुंबई तरुण भारतमध्ये मराठी भाषेतील तर ऑप इंडिया यावर इंग्लिश व हिंदी भाषेतील ट्विट प्रकाशित करण्यात आले आहेत.
यामध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना @iidlpgp हे ट्विटर हॅण्डल फॉलो करणे गरजेचे होते. डायरेक्ट मेसेजचा पर्याय संपर्काकरिता खुला ठेवावा लागणार होता. तसेच, #Tweet4Bharat हा टॅग ट्विट थ्रेड मध्ये वापरणे गरजेचे होते. 






































@@AUTHORINFO_V1@@