'पुनःश्च हरी ॐ म्हणता अन 'हरी'लाच कोंडून ठेवता'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

uddhav thakeray_1 &n



मुंबई
: पुनःश्च हरी ॐ म्हणत राज्यातील अनलॉकची प्रक्रिया सुरु करत राज्य सरकारने विविध गोष्टी सुरु करण्याचा निर्णय घेत आहे, मात्र अद्यापही मंदिरांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने मनसेने राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.



मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर म्हणाले की, पुनःश्च हरी ॐ म्हणता व "हरी" ला च कोंडून ठेवता. बार उघडले, मग बारची वेळ देखील वाढवून दिली. आता जलतरण तलाव , मल्टिप्लेक्सला परवानगी, मग कोरोना फक्त मंदिरातच होईल का? काय तर्क (Logic) असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे. असेही ते म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाच्या नावावरून देखील नाराजी व्यक्त केले. ते म्हणतात, "कोणीही उठावे आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखवावे हे नित्याचेच झाले. "लक्ष्मी बॉम्ब" चे नाव बदलले परंतु सेन्सॉर बोर्ड ने इथून पुढे अशा कोणत्याही धार्मिक भावना दुखविणाऱ्या ना अजिबात परवानगी च देऊ नये व हा खेळ कायमचा थांबवावा." अशी मागणी त्यांनी केली.


दरम्यान, भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीकडून तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराजवळ आंदोलन करण्यात येणार होते, मात्र याठिकाणी कलम १४४ जमावबंदी लागू करण्यात आली, याठिकाणी भाजपा ज्याठिकाणी आंदोलन करणार तेथील मंडपही प्रशासनाने मध्यरात्रीच्या सुमारास उखडून टाकले. त्यामुळे भाजपाला हे आंदोलन स्थगित करावे लागले. मात्र आंदोलन स्थगित करताना अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.तुषार भोसले म्हणाले की, आमचा नवचंडीचा यज्ञ होऊ दिला नाही, साधूसंताचा श्राप या सरकारला लागेल. सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात येत होतं, आम्ही कुणाला घाबरत नसून भाविकांची गैरसोय नसावी म्हणून आंदोलन स्थगित करत आहे, मात्र मंदिरं खुली करण्याच्या मागणीवर भाजपा ठाम आहे असं त्यांनी सांगितले.तसेच या सरकारला कोणाविषयी संवेदना उरल्या नाहीत, साधुसंतांनाही अटकेची धमकी दिली जाते, पत्रकारांना अटक होते, सरकारमुळे कोणताही घटक संतुष्ट नसेल तर निश्चितच मुघलांपेक्षा आणि ब्रिटिशांपेक्षा हे वाईट सरकार आहे असा घणाघात तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर केला.
@@AUTHORINFO_V1@@