हाथरस घटनेवरून राजकारण करणारे कुठे झोपलेत ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |

hathras_1  H x




पुणे :
शिरुर तालुक्यातील न्हावरे गावातील एका महिलेवर क्रूर हल्ला करुन तिचे डोळे काढण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणातील नराधमांना तात्काळ अटक करण्याची आग्रही मागणी विधानपरिषद विरोधी प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकांकडे केली. हाथरसच्या घटनेचा देशभर बोलबाला करणारे आता कुठे झोपलेत? हाथरस रोज मुंबईसह महाराष्ट्रात घडतेय होतेय. परंतु हाथरसचे राजकारण करण्यात आल्याचे सांगत दरेकर यांनी हाथरस प्रकरणी टीकेचे रान उठवण्याऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.


दरम्यान, शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे विनयभंगाला विरोध करणाऱ्या महिलेचे डोळे निकामी करण्यात आल्याची गंभीर घटना घडली होती. या घटनेतील गंभीर जखमी महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. महिलेच्या नातेवाईकांची भेट घेत प्रवीण दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबाला आधार दिला. यावेळी शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर हे देखील उपस्थित होते.


“त्यादिवशी नेमके काय घडले ते मी सर्व सांगेन…आरोपींना मी ओळखते.. त्या नराधमांनी माझ्यावर काय-काय अत्याचार केले हे पण सांगेन… पण मला माझे दोन्ही डोळे परत द्या…अशी आर्त विनवणी शिरुर घटनेतील पीडित महिलने आज केली. यावेळी दरेकर म्हणाले, पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसात अशा घटना अनेक घडल्या आहेत. महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. हे हृदय हेलवणारे आहे. एखादा डोळा तरी पूर्ववत करावा, त्यासाठी मी स्वतः यंत्रणेशी संपर्कात राहणार आहे. एवढी गंभीर घटना असून देखील आरोपीला अद्याप अटक नाही. अशा घटनांमध्ये आरोपीचा शोध युद्ध पातळीवर घ्यायला हवा. तसेच काबाडकष्ट करूनपोट भरणारा परिवार आहे. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व जण आहोत. पुण्यासाठी ही अशोभनीय घटना आहे. आमची मान शरमेने खाली जायला लावणारी ही घटना आहे असेही दरेकर म्हणाले. तसेच हाथरससारख्या घटना रोज मुंबई आणि महाराष्ट्रात घडत आहेत, परंतु हाथरसच्या घटनेचे राजकारण झाले. पण आता या शिरुरच्या घटनेमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे आणि हा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे. नाही तर रोज शिरुरसारख्या घटनेप्रमाणे महिलांना अत्याचारांच्या प्रसंगांना सोमोरे जावे लागेल, अशी चिंताही दरेकर यांनी व्यक्त केली. प्रवीण दरेकर यांनी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांची या प्रकरणासंदर्भात भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
@@AUTHORINFO_V1@@