ठाणे स्थानकात प्रवाशांची रात्रीही ‘अँन्टीजन टेस्ट’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Nov-2020
Total Views |
Thane_1  H x W:
 
 
ठाणे : कोविड १९ चा संसर्ग कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून आता गुरुवारपासून ठाणे स्थानकाबाहेर रात्रभर अँन्टीजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशान्वये ही चाचणी सुरू करण्यात आली असून पहिल्याच रात्री ८३२ प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्यात आली.
 
 
ठाणे महापालिकेच्यावतीने गेल्या काही महिन्यांपासून बाहेरील राज्यातून येणाऱ्या श्रमिक व प्रवाशांची ठाणे रेल्वे स्टेशनवर अँन्टीजन चाचणी करण्यात येते. परंतू सध्या रात्रीच्यावेळी बाहेरील राज्यातून शहरात येणाऱ्या प्रवांशाची संख्या वाढत असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रात्रीच्यावेळी बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची अँन्टीजन चाचणी करण्याची मागणी होत होती.
 
 
या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बाहेरून येणाऱ्या सर्व प्रवाशांची रात्रीच्या वेळी अँन्टीजन चाचणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी घेतला होता. ठाणे स्टेशनवर यापुढे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यत बाहेरील राज्यातून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची ३ पथकांच्या साहाय्याने अँन्टीजन चाचणी करण्यात येत आहे.



@@AUTHORINFO_V1@@