केडीएमसी कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा बोनस!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |
KDMC1_1  H x W:
 
 
 

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीत १५ हजार रुपये बोनस दिला जाणार असल्याची घोषणा महापौर विनिता राणो यांनी केली. महापौर दालनात बोनस देण्यासंदर्भात बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, सभागृह नेते प्रकाश पेणकर, भाजप गटनेते राहूल दामले, मनसे गटनेते मंदार हळबे आदी उपस्थित होते.
 
 
 
मागील वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना १४ हजार रुपयांचा बोनस दिला होता. यंदाच्या वर्षी कोरोना काळात कर्मचाऱ्यांवर ताण असल्याने त्यांना २५ हजार रुपयांचा बोनस द्यावा अशी मागणी पालिका कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी केली होती. यासंदर्भात पाटील यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांची भेट घेतली होती.
 
 
 
बैठकीत कामगारांना सातवा वेतन आयोगही लवकर लागू करावा या मागणीचा पुनरुच्चर करण्यात आला होता. कामगार संघटनेच्या मागणीनुसार प्रशासनाकडून दिला जाणा:या बोनसची रक्कम कमी असल्याचे कामगारांनी सांगितले. मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी एक हजार वाढीव बोनस मिळणार आहे.



@@AUTHORINFO_V1@@