जाणून घ्या! दिवाळीत खरेदीचे ‘हे’ सात मुर्हूत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |
Dia_1  H x W: 0
 
 



या आठवडाभरात ७ नोव्हेंबर (पुष्य नक्षत्र) ते दिवाळीपर्यंत सात असे मुहूर्त आले आहेत, ज्यात गाड्यांपासून इलेक्ट्रोनिक वस्तूंची खरेदी करणे अत्यंत लाभदायक असणार आहे. १३ नोव्हेंबर वगळता प्रत्येक दिवस खरेदीसाठी शुभ असणार आहे. १७ वर्षांनंतर दिवाळीत सर्वार्थसिद्धी योग बनत चालला आहे. यापूर्वी २००३ मध्ये असाच योग आला होता.
 
 
 
ज्योतिषांच्या मते, या दिवाळीतील खरेदी ही फायद्याची असणार आहे. याशिवाय ७ नोव्हेंबरच्या पुष्य नक्षत्रात चंद्रमा, बृहस्पती आणि शनी आपापल्या राशीत राहणार आहेत. बुध-शुक्र एकमेकांच्या राशीमध्ये असल्याने धनयोग कायम राहणार आहे. ग्रहांची स्थिती कमी खर्चात जास्तीत जास्त नफा देणारी राहणार आहे.
 
 
कोणत्या दिवशी काय मुहूर्त ?
 
 
 
७ नोव्हेंबर : शनिवार आणि पुष्य नक्षत्राचा संयोग आल्याने या दिवशी शनि पुष्य योग कायम राहणार आहे. संपूर्ण दिवसभर रवियोग असणार आहे. या दिवशी प्रत्येक खरेदी करणे शुभ आहे. शनिवार असल्याने प्रॉपर्टी, फर्नीचर, मशीनरी आणि लाकडी सजावटीच्या वस्तूंची खरेदी शुभ मानली जात आहे.
 
 

८ नोव्हेंबर : या दिवशी कुमार योग आणि रविवार आहे. अश्लेषा नक्षत्र आणि अष्टमी तिथीचा संयोग आहे. या मुहूर्तावर खाद्यपदार्थ, औषधे, तसेच नव्या कार्याची सुरुवात करणे शुभ असणार आहे.
 
 
९ नोव्हेंबर : सोमवार आणि मघा नक्षत्राच्यी संयोगात या दिवशी मिठाई, मोती, सुगंधीत वस्तू, एक्वेरिअम, महिलांसाठी वस्तू खरेदी करणे शुभ ठरेल.
 
 
१० नोव्हेंबर : मंगळवार आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्र संयोगात या दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करणे शुभ असेल. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस शुभ असेल.
 
 
११ नोव्हेंबर : या दिवशी उत्तराफाल्गुनी नक्षत्र असल्याने वृद्धी देणारा वर्धमान योग आणि चंद्र मंगळ इष्ट संबंध असल्याने महालक्ष्मी योग असणार आहे. या मुहूर्तावर विविध वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते. तसेच वैधृति योगही असणार आहे. त्यामुळे अवजारे, मशिन, मोटार वाहन खरेदीसाठीही हा मुर्हूर्त मानला जात आहे.
 
१२ नोव्हेंबर : या दिवशी धनत्रयोदशी आहे. खरेदीसाठी हा शुभमुर्हूतांपैकी एक मानला जातो. या दिवशी प्रदोष आणि हस्त नक्षत्राचा योग असणार आहे. वाहन, भूमी, भवन, दागिने आणि वस्त्र इत्यादी खरेदी मंगलमय असेल.
 
 
१४ नोव्हेंबर : दिवाळीच्या शुभमुर्हूतावर सूर्योदयासह सर्वार्थसिद्धि योग सुरू होणार आहे. हा योग रात्रौ आठ वाजेपर्यंत असणार आहे. लक्ष्मीपूजनासह या दिवशी खरेदीसाठी विशेष मुहूर्त असणार आहे.
 
 
नोव्हेंबर महिन्याचा प्रत्येक शनिवार हा शुभ असणार आहे. ७ नोव्हेंबर पुष्य नक्षत्र आणि रवियोग, दुसरा शनिवार १४ नोव्हेंबर सर्वार्थसिद्धि योग, तिसरा शनिवार द्विपुष्कर योग आणि चौथा रवियोग असणार आहे.
 
(काशीचे ज्योतिषी गणेश मिश्र यांच्यानुसार.)
@@AUTHORINFO_V1@@