तारीख पे तारीख ! अर्णब अटक प्रकरणात सुनावणी उद्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |

Mumbai High Court_1 
 
 
मुंबई : पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवर सुरू असलेली सुनावणी उद्यावर टाकण्यात आली आहे. जेष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. तसेच अलिबाग न्यायालयात नियमित जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी अजूनपर्यंत न्यायालयाकडून वेळ मिळालेला नसल्याची माहिती अर्णबच्या वकिलांनी उच्च न्यायालयात दिली.
 
 
मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या न्यायपिठासमोर सुनावणी सुरू होती. अर्णब गोस्वामी यांची बाजू जेष्ठ विधिज्ञ हरीश साळवे आणि अबद पोंडा यांनी मांडली. पोलिसांनी न्यायालयाच्या सहमतीशिवाय तपास सुरू केला. तसेच पोलीस कोठडीमिळवण्यासाठी सरकारच्या बाजूने ठोस युक्तिवाद झाला नव्हता. त्यामुळे न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र न्यायलयायीन कोठडी मिळाल्यानंतर नियमित जामीन अर्ज दाखल करण्याची आरोपीला मुभा असते.
 
 
परंतु अर्णब यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यासाठी अलिबाग न्यायालयाने वेळ दिला नसल्यामुळे, आम्ही अर्ज मागे घेतला आहे, अशी माहिती पोंडा यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. पोलिसांची बाजू आम्ही ऐकून घेऊ असे न्यायालयाने म्हटले. त्यावर जेष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी अर्णब यांचा जामीन मंजूर करून अंतरिम दिलासा देण्याची मागणी केली. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला नाही. अर्णब अटक प्रकरणी आता उद्या उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@