चिंता वाढली! : २४ तासांत ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णवाढ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |
CORONA_1  H x W




नवी दिल्ली
: कोरोना विषाणू संक्रमणाचा आकडा दररोज कमी होत असताना आज मात्र, चिंताजनक बाब उघडकीस आली आहे. गेल्या २४ तासांत नव्याने झालेल्या संक्रमितांचा आकडा ५० हजार २०९ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांत ५० हजारांवर आकडा पहिल्यांदाच गेला आहे. कोरोनामुळे काल दिवसभरात ७०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य कुटूंब कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.
 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २४ तासांत कोरोनाच्या ५० हजार २०९ रुग्णांची भर पडली आहे. देशात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही ८३ लाख ८४ हजार ८६ इतकी झाली आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे. देशात संक्रमणमुक्त झालेल्यांची एकूण संख्या ७७ लाख ११ हजार ८०९ इतकी झाली आहे. २४ तासांत ५५ हजार ३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
 
 
या आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची एकूण संख्या सहा लाखांपेक्षा कमी आहे. देशभरात एकूण ५ लाख २७ हजार ९६२ सक्रीय रुग्ण आहेत. २४ तासांत ५ हजार ८२५ रुग्णांची घट झाली आहे. देशभरात एकूण १ लाख २४ हजार ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.





@@AUTHORINFO_V1@@