बळीराजा आत्महत्या करतोय मात्र मुख्यमंत्र्यांना काळजी खुर्चीची

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |

chandrakantdada patil _1&



मुंबई :
राज्यात शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्भवला असताना आपले मुख्यमंत्री ते बाजूला करुन नवीन प्रकरणांच्या आधारे जनतेला आणि शेतकऱ्यांना मूळ मुद्द्यांवरून भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा घणाघाती आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

याबाबत ट्विट करत चंद्रकांतदादा पाटील यांनी सरकारवर आरोप केले. ते म्हणतात,"सध्या राज्यातील शेतकऱ्यांना अनेक संकटाना सामोरं जावं लागत असून ते हवालदिल झाले आहेत. निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर या नैसर्गिक आपत्तींमुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हे सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी वाचनात आली, ती म्हणजे गेल्या १० महिन्यांमध्ये पश्चिम विदर्भातील ८७२ मायबाप शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. यामध्ये गेल्या ऑक्टोबर महिन्यातच ५१ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. या दाहक वास्तवाची जाणीव तरी या सत्तेचा माज असलेल्या राज्य सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांना आहे का? मात्र राज्यातील हे महत्त्वाचे प्रश्न बाजूला सारून पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करून मूळ मुद्द्यावरून जनतेला भरकटवण्याचे काम सध्या राज्य सरकारकडून सुरु आहे.कित्येक शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. मात्र त्याची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. भरपाई देण्यास टाळाटाळ केली जातेय. त्यांच्या तक्रारींचे निवारण केले जात नाहीये. सध्याचे मुख्यमंत्री युती सरकारच्या काळात शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते, मात्र आता ते स्वतः राज्याच्या सर्वोच्च पदी असून शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही महत्त्वाचं पाऊल उचलू शकत नाहीत का? खुर्चीवरून उठावसं वाटतच नाही का? असा सवाल चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला.

तसेच ते पुढे म्हणतात, "सत्ता मिळाली तर शेतकऱ्यांचाच विसर पडला आहे तुम्हाला .या सर्वांमध्ये महत्त्वाचं म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे लक्ष न देता, त्यांना आपल्या खुर्चीचीच अधिक काळजी वाटत आहे. बळीराजा आत्महत्या करतोय पण यांना मात्र पोलिसांवर हात उगारणा-या आपल्याच सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांना वाचवायचे आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं तर काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेईल, याची यांना प्रचंड भीती. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, असं म्हणणाऱ्या या महाभकास आघाडीचं हे केवळ थोतांड आहे. बळीराजाचा तुम्ही आता जितका छळ करीत आहात, त्यापेक्षा, जास्त छळ तुमचा पुढील निवडणुकांमध्ये जनतेकडून होईल, एवढं नक्की ! काडीचं मोल नसणाऱ्या या मदतीच्या रकमेतून शेतकऱ्यांना काहीही मिळणार नाही. आम्ही मोठी मदत केली अशा बढाया राज्य सरकार मारीत आहे. मात्र राज्य सरकारकडून अन्य कुठले तरी प्रकरण. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यातील शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींना तोंड देत आहेत. मात्र राज्य सरकारकडून कोणतेतरी प्रकरण उकरून काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना थेट बाजूला सारण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्य सरकारने बळीराजाला अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आहे. त्यांची पिके, घरे, गुरे-ढोरे वाहून गेली आहेत. आत्महत्येशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरला नाही, अशामध्ये तुम्ही त्यांना मदत न करता आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राजकारण करताय? मात्र आम्ही बळीराजासाठी सुरु ठेवलेला लढा कायम ठेवू आणि आमच्याकडून शक्य होईल तितकी मदत बळीराजाला करु, असा आश्वासनदेखील चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.
@@AUTHORINFO_V1@@