आता न्यायालय महाराष्ट्रद्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |

Ashish Shelar_1 &nbs



मुंबई :
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याबाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्द्यांचा हवाला देत भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'आता मा.न्यायालयालच महाराष्ट्रद्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख ? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.


भाजप नेते आशिष शेलारांवरी ट्विट करत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.संपादक अर्णब गोस्वामी यांच्याबाबत रायगडच्या मा. मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेला निवाड्यातील मुद्दे १) २०१८सालच्या घटनेबाबत कोणताही ठोस पुरावा आलेला नाही त्यामुळे "अ" समरी अहवाल (क्लोजर रिपोर्ट) स्विकारला गेला.२ )पोलीस कोठडीचे सर्थन करणारे कोणतेही योग्य, संयुक्तिक व कायदेशीर कारण आढळत नाही.३) पोलिसांना मोघमपणे तपास करता येणार नाही. असे म्हणत सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या सुडबुध्दीचा, असहिष्णुतेचा न्यायालयाने पर्दाफाश केला असल्याचे शेलार म्हणाले. तसेच, आता मा. न्यायालयच महाराष्ट्रद्रोही आहे म्हणून फटाके फोडणार का? आता उद्याचा अग्रलेख न्यायालयावर..? असा सवाल उपस्थित करत,खंजीर, तलवार, इतिहासातील शब्दांवर उगाच सगळा भार! उडवा उडवा, शब्दांचे फुलबाजे उडवा! रोज उघडे पडा! असा टोला संजय राऊत व शिवसेनेला लगावला.


दरम्यान, अन्वय नाईक या कथित आत्महत्या प्रकरणात पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटकेनंतर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळून लावण्यात आली. अर्णब गोस्वामींना 'पोलीस कोठडी' ऐवजी 'न्यायालयीन कोठडी' देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांना कोर्टाच्या पहिल्याच पायरीवर मोठी चपराक बसली आहे. तसेच न्यायालयात तपास बंद करण्याविषयीचा अहवाल सादर केलेला असताना, परस्पर तपासप्रक्रिया कशी सुरू करण्यात आली, असा प्रश्न सुनावणीदरम्यान समोर आल्याची माहिती आहे.

@@AUTHORINFO_V1@@