"आधी मायलेकींचे संरक्षण करा, सरकार कुणासाठी चालवता?"

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Nov-2020
Total Views |
 
Pravin Darekar_1 &nb
 
 
 
पुणे : रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना बुधवारी अटक केली. त्यानंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये टीका करण्याचे सत्र सुरु झाले. महाराष्ट्र सरकारने केलेल्या या कारवाईवर भाजपने आक्षेप घेत आंदोलने केली. मात्र, दुसरीकडे पुण्यातील शिरूर तालुक्यामध्ये एका महिलेवर अत्याचार करत दोन्ही डोळे निकामी करण्यात आले. यावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करत 'सरकारविरुद्ध बोलणाऱ्या माध्यमांची गळचेपी करण्याआधी राज्यातील मायलेकींचे संरक्षण करा. सरकार कुणासाठी चालवता?' असा सवाल उपस्थित केला आहे.
 
 
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी ट्विट केले आहे की, "सरकारविरुध्द किंवा आपल्या नेत्यांविरुध्द बोलणाऱ्यांना गजाआड करण्याचे एकमेव काम महाविकास आघाडी सरकारने पोलीस दलाला दिल्यासारखी परिस्थिती महाराष्ट्रात सध्या दिसत आहे. मतभेद व्यक्त करणाऱ्यांची जरुर गळचेपी करा. त्याचा हिशोब नंतर जनता तुमच्याकडून घेईलच. पण, किमान राज्यातल्या मायलेकींचे संरक्षण तरी करा. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये महिलेचे डोळे फोडले, दिवसाढवळ्या पेट्रोलपंपावर बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. हे सरकार कुणासाठी चालवता?" असा खडा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
 
पुण्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात महिलेवर बळजबरी करण्यात आली. तिने विरोध केला असता आरोपीने महिलेचे दोन्ही डोळे निकामी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात ३० वर्षीय व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@