विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त ! सेंट जॉर्जमधून डिस्चार्ज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

devendra fadanvis_1 


मुंबई :
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या १२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुढील दहा दिवस फडणवीस यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.


'लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !' असे आवाहन फडणवीस यांनी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह येताच केले होते. कोरोनाचा संसर्ग झाल्यास आपण सरकारी रुग्णालयांत उपचार घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते. त्यानुसार कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर फडणवीस हे मुंबईच्या सेंट जॉर्ज या सरकारी रुग्णालयात दाखल झाले. महाराष्ट्रातील जनतेकडूनदेखील फडणवीस यांनी लवकरात लवकर कोरोनातुन बरं व्हावे यासाठी शुभेच्छा व आशीर्वाद देण्यात येत होते. देवेंद्र फडणवीस हे बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रभारी म्हणून काम पाहत होते. मात्र, राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांनी तीन दिवस महाराष्ट्राचा दौरा केला. त्यामध्ये, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या.


देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली घसरल्यामुळे गेल्या आठवड्यात त्यांना काही स्टेरॉईडस् आणि रेमडेसीवरही देण्यात आले होते. यानंतर त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९७ पर्यंत वाढली. गेल्या रविवार-सोमवारी देवेंद्र फडणवीस यांना प्लाझ्मा थेरपीचे डोसही देण्यात आले होते.
@@AUTHORINFO_V1@@