ठाकरे सरकारकडून लोकशाहीची हत्या : गिरीश महाजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |

Girish Mahajan_1 &nb
 
मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी बुधवारी अटक केली. मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी हे कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. यावरून आता महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. 'पत्रकाराला अटक म्हणजे ठाकरे सरकारने लोकशाहीची हत्या केली आहे.' असे मत भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे.
 
 
 
 
 
 
 
"महाराष्ट्रामध्ये महाविकासाघाडीकडून ‘अघोषित आणीबाणी'द्वारे लोकशाहीची हत्या केली आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीता क्षेत्रावर हा मोठा आघात आहे. विरोधात भुमिका मांडली म्हणून अर्णव गोस्वामींविरूद्ध महाविकासआघाडी सरकारतर्फे सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध करत आहोत." असे ट्विट करत ठाकरे सरकारवर गिरीश महाजन यांनी निशाणा साधला.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@