दिव्यांनी उजळले गणेश मंदिर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |
deepotosav_1  H
 
 
 

त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त दिपोत्सव साजरा

डोंबिवली : गणेश मंदिर आणि मंदिराचा परिसर आज दिव्यांनी उजळून निघाला होता. निमित्त होते ते त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिपोत्सवाचे. गणेश मंदिर संस्थानात दिपोत्सव आणि खाद्यतेल ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.गणेश मंदिरात गेल्या वीस वर्षापासून दिपोत्सव साजरा केला जात आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि गणेश मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने खाद्यतेल ज्ञानयज्ञ हा उपक्रम राबविला जात आहे.
 
नागरिक गणेश मंदिरात खाद्यतेल आणून देतात. हे खाद्यतेल जमा करून सेवाभावी संस्थांना दिले जाते. हा उपक्रम गेल्या तीन वर्षापासून राबविला जात आहे. नागरिकांनी आजच्या दिवसात 35० लीटर तेल आणून दिले आहे. हा उपक्रम अजून दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे. नागरिकांनी मोठय़ा संख्येने खाद्यतेल आणून दयावे असे आवाहान रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि मंदिरातर्फे करण्यात आले आहे.
 
गणेश मंदिरात दरवर्षी नागरिक मोठय़ा संख्येने दिपोत्सवासाठी उपस्थित असतात. प्रत्येक नागरिकांकडून एक-एक दिवा प्रज्वलित केला जात असे. पण यंदा कोरोना संकटामुळे मंदिरातील महिला कर्मचा:यांनी दिवे प्रज्वलित केले. सामाजिक अंतराचे सर्व नियम पाळून दिपोत्सव साजरा करण्यात आला. दरवर्षी लक्ष दिव्यांनी मंदिर सजत असे. यंदा कोरोनाचा सावट दिपोत्सवावर दिसून आले. यंदा एक हजाराहून अधिक दिवे प्रज्वलित केले होते.
 
कार्यक्रमाच्या सुरूवातीला दीप प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर मंदिराचे कार्यवाहक शिरीष आपटे यांच्या हस्ते दीप आरधना करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे प्रकल्पप्रमुख चंद्रशेखर देशपांडे आणि अश्विनी देशपांडे , मंदिराच्या उपाध्यक्षा अलका मुतालिक, गौरी खुंटे यांनी दीप आराधना केली. यावेळी गणोश मंदिराचे पदाधिकारी प्रविण दुधे, रोटरी क्लब डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष दिलीप भगत, सचिव शैलेश गुप्ते , श्रीपाद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
त्रिपुरी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा करून शिवाची आराधना केली जाते. ही प्रकाशाची उपासना आहे. दिव्याची उपासना ही सगुणाकडे जाणारी आहे. उपासना हे सत्व गुणांचे विराट दर्शन आहे. सत्व गुणांचे समाज संघटन त्याला धर्म म्हणतात. चांगल्या गुणांना बांधून ठेवण्यासाठी सामुदायिक उपासना असते. हा दिपोत्सव सुध्दा चांगल्या गुणांना बांधून ठेवण्यासाठी केलेली उपासना आहे, असे मंदिराच्या उपाध्यक्षा अलका मुतालिक यांनी सांगितले.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@