डोंबिवली खोणीत आगरी-कोळी आणि वारकरी भवन उभारणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Nov-2020
Total Views |

Raju Patil_1  H
 
 

मनसे आमदार राजू पाटील यांची घोषणा

 
 
डोंबिवली : आगरी-कोळी बोलीला राजाश्रय मिळावा यासाठी तिचे जतन आणि संवर्धनात पुढाकार घेत असलेल्या ठाण्यातील साहित्यिकांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेऊन काही मागण्या केल्या आहेत. महाराष्ट्रातील बोलीभाषा संवर्धनासाठी आगरी भवन व वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभाणार असल्याची घोषणा ही राजू पाटील यांनी यावेळी केली.
 
ठाण्याची मूळ भाषा असलेली आगरी-कोळी भाषा इतर बोलींप्रमाणो लुप्त होऊ नये यासाठी साहित्यिक सव्रेश तरे, भूमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, चित्रकार-साहित्यिक मोरेश्वर पाटील, गीतकार-गायक दया नाईक यांनी मनसे आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. आगरी कोळी बोलीभाषा जगविण्यासाठी आगरी कोळी बोली, संस्कृती जतन संवर्धनार्थ आगरी-कोळी भवन व आगरी कोळी भाषा दालन व्हावे, आगरी कोळी बोलीतील साहित्य निर्मितीला प्रोत्साहन व्हावे यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबीर राबविणो. बोलीभाषा प्रसार-संवर्धनासाठी जिल्हास्तरीय संशोधन केंद्र निर्माण करणो. नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आगरी कोळी भाषा आणि तिचे दुर्मिळ साहित्य ग्लोबल करणो गरजेचे आहे.
 
 
 
महाराष्ट्र राज्य सरकारने २०१४ मध्ये भाषेविषयी धोरणात बोलीभाषेचे संवर्धन करणो. लोकगीत, लोककला, लोककथा संकलन प्रसिध्द करणो, मराठी भाषा समृध्द करण्यासाठी बोलींचे शब्दकोश तयार करणो, बोलीचा अभ्यास संकलन आणि संशोधन करण्यासाठी यंत्रणा उभारली जाईल असे नमूद केले आहे. या धोरणातील बाबीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहान साहित्यिकांनी केली आहे.
 
 
 
दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी एकंदर बोलीभाषा संवर्धनासाठी आपण सोबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून येथील स्थानिकांकडून आगरी भवन आणि वारकरी संप्रदायाकडून वारकरी भवन उभारण्याची मागणी अनेक जण करीत होते. पण स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सरकारकडून त्याची दखल घेतली जात नव्हती. अखेर सरकारी मदतीवर अवलंबून न राहता ते स्वखर्चाने खोणी येथे आगरी कोळी आणि वारकरी भवन बांधणार आहे. या भवनाचा येत्या १९ डिसेंबरला भूमीपूजन करणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
 
 
 
 
भूमीपूत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील, ठाण्यातील साहित्यिक मोरेश्वर पाटील, दया नाईक, सव्रेश तरे, र्मचड नेवी अधिकारी गणोश पाटील यांच्या हस्ते देण्यात पाटील यांना निवेदन दिले. यावर लवकरच भरीव कार्य करू. आगरी-कोळी बोली व तिचे साहित्य जतन व संवर्धनासाठी प्रयत्न करू असे ही पाटील यांनी सांगितले.
 
 
 
 
कसे असेल आगरी कोळी व वारकरी भवन ?
 
या वारकरी भवनात किर्तनकार वारक:यांसाठी रात्री राहण्यासाठी व्यवस्था असेल. भजन, प्रवचन, किर्तनकार व समाजातील कोणत्याही प्रकारच्या गायकांसाठी एक रेकॉर्डीग स्टुडिओ येथे असेल. आगरी व विविध बोली भाषेतील साहित्य व एक ग्रंथालय असेल.


@@AUTHORINFO_V1@@