इस्लामिक दहशतवादाने भळभळता युरोप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |
Europe _1  H x
 
 

युरोपात कधी कधी झाला रक्तपात ? वाचा सविस्तर


युरोपात वाढत्या दहशदवादी हल्ल्यांच्या घटनांमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत फ्रान्समध्ये सर्वाधिक दहशतवादी हल्ले झाले. गेल्या चार महिन्यांत हे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. मंगळवार, दि. ३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रीयाची राजधानी वियाना येथेही हल्लेखोरांनी गोळीबार केला. जगभरातून या अशा घटनांची निंदा केली जात आहे. काही घटनांमध्ये तर केवळ एकच दहशतवादी होता. कोरोना विषाणू महामारीशी लढत असताना दहशतवादी हल्ल्याचे सावट आहे.
 

जागतिक स्तरावर दहशतवाद थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्यात जगभरातील सुरक्षा यंत्रणा कमी पडत आहेत का, असा प्रश्न या हल्ल्यांच्या आकडेवारीमुळे पडतो. आशिया आणि आफ्रीकेतून येणाऱ्या दहशतवाद्यांतर्फे हे हल्ले घडवले जात आहेत. त्यामुळे युरोपात स्थलांतरीत आणि शरणार्थींचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.
 
 
 
युरोपात कधी कधी झाला रक्तपात ?
 
 
३ नोव्हेंबर २०२० : ऑस्ट्रीयाची राजधानी वियना शहरात हल्लेखोरांनी कॅफे आणि रेस्ट्रोरंटमध्ये गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. अत्याधुनिक हत्यारांद्वारे हा हल्ला करण्यात आला.
 
 
 
१ नोव्हेंबर २०२० : फ्रान्सच्या लियोन शहरात एक यूनानी पादरीची गोळी मारून हत्या करण्यात आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लियोनमध्ये एक गिरजाघरात पादरीवर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला होता. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिकारीसाठी वापरली जाणारी रायफल वापरली होती.
 
 
 
२९ ऑक्टोबर २०२० : फ्रान्सच्या नीस शहरात एका चर्चमध्ये हल्लेखोराने ‘अल्लाहू अकबर’ म्हणत एका महिलेचा गळा चिरला होता. दोन अन्य लोकांची चाकूने वार करत हत्या केली. फ्रान्सचे मेअर क्रिश्चिअन एस्ट्रॉसी यांच्याविरोधात हल्ल्याचा एक भयानक कट रचण्यात आला होता. पोलीसांनी यानंतर हल्लेखोराला अटक केली.
 
 
१७ ऑक्टोबर २०२० : फ्रासिसी स्कूलचे शिक्षक सॅम्युअल पेंटी यांची पॅरीसच्या उपनगरात मुंडके छाटून हत्या करण्यात आली. पॅटी यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून मोहम्मद पैगंबरांचे एक व्यंगचित्र विद्यार्थ्यांना दाखवले होते. शिक्षकाचे मुंडके छाटणारा एक १८ वर्षीय चेचन्या मूळ तरुण होता. या प्रकरणात पोलीसांनी आरोपीला गोळी घातली होती. फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅनुअल मॅक्रॉन यांनी याला दहशतवादी हल्ला म्हणत निंदा केली होती.
 
 
२९ सप्टेंबर २०२० : व्यंग पत्रिका ‘शार्ली हेब्दो’च्या पॅरीस स्थित जुन्या कार्यालयाबाहेर मांस कापण्याच्या चाकूने हल्ला करण्यात आला होता. यात दोघेजण जबर जखमी झाले होते. आरोपी हा कार्यालय जाळण्याच्या तयारीत आला होता. २५ वर्षीय या हल्लेखोरालाही पोलीसांनी अटक केली. हा आरोपी पाकिस्तानी असल्याचे निदर्शनास आले होते. अटकेवेळी त्याचे कपडे रक्ताने माखले होते.
 
 
 
२९ नोव्हेंबर २०१९ : एक बनावट आत्मघाती वेस्ट परीधान केलेल्या एका व्यक्तीला ब्रिटीश पोलीसांनी गोळी घालून ठार केले. या हल्लेखोराने दोघांवर चाकूने हल्ला करत हत्या केली होती. यात तीन जण जखमी झाले होते. ब्रिटन सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले होते.
 
 
 
७ एप्रिल २०१८ : जर्मनीत म्युएन्स्टर शहरात एक व्यक्तीने हॉटेल बाहेर बसलेल्या व्यक्तींवर एक गाडी चढवली होती. हल्लेखोराने त्यानंतर आत्महत्या केली. जर्मनीने याला दहशतवादी हल्ला म्हटले होते.
 
 
 
२३ मार्च २०१८ : एक बंदूकधारीने दक्षिण-पश्चिम फ्रान्समध्ये एका गाडीत पोलीसांवर गोळीबार झाला. एका सूपर मार्केटच्या ग्राहकांना ओलीस ठेवण्यात आले होते. गोळीबारी करताना हल्लेखोर ‘अल्लाहू अकबर’ घोषणा देत होता. सुरक्षादलाच्या जवानांनी हल्लेखाराला ठार केले.
 
 
 
१७ ऑगस्ट २०१७ : स्पेनच्या बास्रिलोनामध्ये एक व्हॅन गर्दीत घुसली. १३ जणांची हत्या करण्यात आली. स्पेनने या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले.
 
 
 
३ जून २०१७ : तीन हल्लेखोरांनी लंडनमध्ये ब्रिजवर पायी जाणाऱ्यांना एका गाडीने धड़क दिली. त्यानंतर चाकूने हल्ला करत आठ लोकांची हत्या करण्यात आली. त्यात ४८ लोक जखमी केले. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली होती.
 
 
 
२२ मे २०१७ : ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका आत्मघाती हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता. ५९ लोक जखमी झाले होते. हा हल्ला ज्यावेळी झाला त्यावेळी अमेरिकन गायक एरियाना ग्रांडे त्यांचे कॉन्सर्ट संपवून निघत होत्या.
 
 
 
७ एप्रिल २०१७ : स्वीडनची राजधांनी स्टॉकहोममध्ये एका चालकाने दलाल स्ट्रीटवर असलेल्या दुकानात गाडी घुसवली. या हल्लात पाच मृत्यू तर १५ जखमी झाले. पोलीसांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले होते.











@@AUTHORINFO_V1@@