फ्रान्सचा ‘एअर स्ट्राईक’! अल-कायदाच्या ५० दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Nov-2020
Total Views |
Miraj _1  H x W




जिहादी दहशतवादाविरोधात फ्रान्सची कठोर भूमिका



पॅरीस : फ्रान्सने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर एअरस्ट्राईक केल्याचा दावा केला आहे. यात अल-कायदाचे ५० दहशतवादी ठार केल्याचे सांगण्यात येत आहे. फ्रान्स सैन्याचे प्रवक्ते कर्नल फ्रेडरिक बार्बरी यांनी चार दहशतवादी पकडल्याची माहिती दिली आहे. तसेच फिदायीन जॅकेट जप्त करण्यात आले आहे. या संघटनेने सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची तयारी केली होती. बुर्कीना फासो आणि नाइझरच्या सीमेवर फ्रान्सच्या ड्रोनला दुचाक्यांचा ताफा दिसून आला.



मिराज विमानांतून क्षेपणास्त्रे डागण्यात आली. फ्रान्सने गेल्या आठवड्यापासून जिहादींच्या विरोधात मोठी आघाडी उभी केली आहे. फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ली यांनी या संदर्भात एक प्रतिक्रीया दिली आहे. “मी एका अशा कारवाईबद्दल माहिती देत आहे जी महत्वाची आहे. ३० ऑक्टोबर रोजी आम्ही एका कारवाईत पन्नासहून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा विस्फोटके ताब्यात घेतली आहे. ”
 
 
 
आयएस दहशतवाद्याच्या विरोधात सुरू आहे ऑपरेशन

सेन्याचे प्रवक्ते बार्बरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएस विंगचे दहशतवादी ‘इस्लामिक स्टेट इन ग्रेटर सहारा’चे दहशतवाद्यांविरोधात एक ऑपरेशन चालवले जात असल्याचे म्हटले आहे. तीन हजार सैनिक या ऑपरेशनमध्ये सहभागी आहेत. महिनाभरापूर्वी ही कारवाई सुरू केली आहे. त्याचे निकाल आता हळूहळू येऊ लागतील. संयुक्त राष्ट्रांनीही शांती अभियानाअंतर्गत १३ हजार सैनिक तैनात केले आहेत. फ्रान्सनेही स्वतःचे ५१०० सैनिक तैनात केले आहेत.
 
 
राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यातर्फे इस्लामिक दहशतवादाचा उल्लेख
 
 
सतत होणाऱ्या हल्ल्यांना इस्लामिक दहशतवाद, असा उल्लेख राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी केला आहे. फ्रान्समध्ये तैनात सैनिकांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. मुस्लीम देशांच्या नेत्यांच्या निशाण्यावर फ्रान्स आहे. कित्येक देश फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकत आहेत.
 
 
व्यंगचित्राचे समर्थन नाही
 
एका माध्यमसंस्थेला दिलेल्या माहितीत फ्रान्स राष्ट्रपती म्हणाले की, “या प्रकरणाचा पूर्णपणे चुकीचा अर्थ काढला जात आहे.
पैगंबर मोहम्मद यांच्या व्यंगचित्राचे मी समर्थन करत नाहीत. यामुळे अनेकांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. मात्र, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही संरक्षण देण्याचा प्रश्न आहे. त्यात व्यंगचित्र छापण्याचाही मुद्दा आहे.




@@AUTHORINFO_V1@@