'धर्माच्या नावाखाली एका महिलेचा छळ ही लाजीरवाणी बाब'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2020
Total Views |

Kangna_1  H x W
 

कंगना रणौतचा कमलरुखला पाठींबा - पंतप्रधान कार्यालयाकडे केली तक्रार 



नवी दिल्ली : बॉलीवुड अभिनेत्री कंगना रणौत हिने ट्विट करत वाजीद खान यांच्या पत्नी कमलरुख यांना पाठींबा दर्शवला आहे. धर्म परिवर्तनासाठी जबरदस्ती केल्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला ट्विट करत प्रश्न विचारला आहे. "जे लोक दंगली करत नाहीत, धर्मपरिवर्तन करत नाहीत, त्यांना आपण कसे सुरक्षित ठेवणार आहोत?"
 
 
 
कंगना रणौतने धर्म परिवर्तनावर प्रश्न उपस्थित करत तीन ट्विट केले. पहिल्या ट्विटमध्ये कंगना म्हणते, "पारसी समाज हा देशात अल्पसंख्यांक आहे. हे लोक देशावर कब्जा करण्यासाठी आलेले नाहीत. ते साधक म्हणून आले. त्यांनी भारतमातेचे आशीर्वाद मागितले होते. आपल्या देशातील सुंदरता, वृद्धी आणि आर्थिक प्रकरणांमध्ये त्यांच्या कमी लोकसंख्येचाही मोठा हातभार आहे."
 
 
 
कंगनाने दुसरे ट्विट करत पीएमओकडे प्रश्न विचारला आहे. "ती (कमालरुख) माझ्या दिवंगत मित्राची पत्नी आहे. पारसी महिला आहे. तिच्या कुटूंबातर्फे तिचे जबरदस्तीने धर्मांतरण करण्यासाठी त्रास दिला जात आहे. पंतप्रधान कार्यालयाला मी विचारू इच्छीते की जे अल्पसंख्यांक कुठलेही नाटक करत नाहीत, कुणालाही दुखावत नाहीत, धर्मांतरण करत नाहीत, त्यांचे संरक्षण आपण कसे करणार आहोत. पारसींची संख्या सातत्याने कमी होत आहे."
 
 
 
कंगना आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये म्हणते. "आईचं तेच मुलं सर्वात जास्त ड्रामा करत असतं ज्यांना सर्वात जास्त फायदा मिळत असतो. ज्याचा या सगळ्यावर अधिकार आहे, जो योग्य आहे, संवेदनशील आहे त्यांसाठी एक नॅनी (मुलांचे संगोपन करणारी) ठेवली जाते. या विषयावर आत्मचिंतनाची गरज आहे."

 
नेमके प्रकरण काय ?
 
सुप्रसिद्ध संगीतकार दिवंगत वाजिद खानची पत्नी कमालरुख यांनी वाजिदचे कुटूंबीय जबरदस्तीने धर्मांतरण करत असल्याचा आरोप लावला आहे. इंस्टाग्रामद्वारे त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. आंतरजातीय विवाहानंतरही वाजिद खानच्या कुटूंबीयांनी त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराला वाचा फोडली आहे. कमालरुख यांनी इन्टाग्रामवर एक विस्तृत पोस्ट लिहीली. 
 
  
लग्नापूर्वी त्या १० वर्षे वाजिद खान यांच्यासह रिलेशनशिपमध्ये होत्या. त्या म्हणाल्या, "मी पारसी आहे आणि ते मुस्लीम होते. आम्ही तेच होतो ज्यांना 'कॉलेज स्वीटहार्ट्स' बोलले जात होते. अखेर आमचा विवाह झाला. स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत आमचे लग्न झाले. याच साठी 'अँटी कन्वहर्जन बिल' माझ्यासाठी महत्वाचे आहे. माझ्या आंतरजातीय विवाहा संदर्भात मला काही अनुभव सांगायचे आहेत.
 
 
 
"एक महिला धर्माच्या नावाखाली किती अडचणींचा सामना करते हे मला सांगायचे आहे. ही एक लाजीरवाणी गोष्ट आहे आणि डोळे उघडणारी आहे. इस्लाममध्ये धर्मांतरणासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता. त्यानंतर हा वाद आमच्या घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचला होता. मी सर्व धर्मांचे महत्व जाणते मात्र, धर्मांतरणावर माझा विश्वास नाही. माझा आत्मसन्मान मला इतर धर्म स्वीकारण्याची परवानगी देत नाही."
 
 
 
पुढे लावलेल्या आरोपात ते म्हणतात, "माझे पालन पोषण एका साधारण पारसी कुटूंबात झाले. आमच्या घरातील लोकांचे विचार लोकतंत्र मानणारे होते. खुल्या विचारांचे होते. स्वातंत्र्याचे होते. वादविवाद करणे, मुद्द्यांवर चर्चा करणे हे आदर्श मानले जात होते. खान यांच्याशी लग्नानंतर हे स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये, शिक्षण या गोष्टी माझ्या सासरच्यांसाठी एक समस्या बनू लागली होती."
 
 
 
कमाल रुख यांनी पोस्टमध्ये त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. ही संपूर्ण पोस्ट कित्येक स्लाईडमध्ये आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 'लव जिहाद' विषयांवर चर्चा केली जात असतानाच कमालरुख यांनी हा मुद्दा उचलला आहे. वाजिद खान यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे.



@@AUTHORINFO_V1@@