वांग्याची शेती पाहिली नाही...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Nov-2020   
Total Views |

Supriya Sule_1  



जाऊ दे बाई. मूळ मुद्दा असा की, पुण्याला यायचंच होतं, तर पुण्याला ‘लवासा’ला भेट का नाही दिली नरेंद्र मोदींनी? ‘लवासा’ पाहिला असता तर आमच्या पवार कुटुंबीयांचे नाव झाले असते म्हणूनच त्यांनी ‘लवासा’ला भेट दिली नाही. माझी वांग्याची शेतीही पाहायला आले नाहीत. किती हा नतद्रष्टपणा. एक पदवीधर झालेली, कॅलिफोर्नियामध्ये राहिलेली महिला वांग्याचे पीक घेते, शेती करते, ते तरी पाहावं ना? पण त्यालाही मोदींनी भेट दिली नाही. कुठे ते लस-बिस बघायला गेले. ती लस आमची आहे.
 
 
पुण्यात आलेत म्हणे कोरोना लस का काय ते बघायला. यांना पुण्याला येऊन काय पाहायचे माहितीच नाही. माझ्या बाबांनी इथेच जवळ ‘लवासा’ उभारला आहे. काय म्हणता? आमच्या कार्यकर्त्यांसाठी की पुणेकरांच्या विरंगुळ्यासाठी उभारला? नाही हं. आमचे बाबा समानता मानतात. ते पुरोगामी आहेत. त्यामुळे मी पण पुरोगामी आहे. पुरोगामी म्हणजे काय? शाहू-फुले-आंबेडकर आणि आता नरेंद्र दाभोळकर यांचे नाव घ्यायचे. ईदला शिरखुर्मा आणि इफ्तारी चापायच्या की झाले पुरोगामी. मला पण माहिती आहे म्हटले. लोक उगीच म्हणतात की, पवारांची लेक म्हणून मला खासदारकी मिळाली. नेतेपद मिळाले.मी तर बाई साधीसुधी राजकारणी आणि समाजसेवक. समाजसेवा करून माझी संपत्ती ११३ कोटी आहे. यावरही जळकूकड्यांचा आक्षेप. त्यांना काय माहिती की वांग्याचे पीक घेतले, शेतीभाती केली, उत्पन्न वाढले. जाऊ दे बाई. मूळ मुद्दा असा की, पुण्याला यायचंच होतं, तर पुण्याला ‘लवासा’ला भेट का नाही दिली नरेंद्र मोदींनी? ‘लवासा’ पाहिला असता तर आमच्या पवार कुटुंबीयांचे नाव झाले असते म्हणूनच त्यांनी ‘लवासा’ला भेट दिली नाही. माझी वांग्याची शेतीही पाहायला आले नाहीत. किती हा नतद्रष्टपणा. एक पदवीधर झालेली, कॅलिफोर्नियामध्ये राहिलेली महिला वांग्याचे पीक घेते, शेती करते, ते तरी पाहावं ना? पण त्यालाही मोदींनी भेट दिली नाही. कुठे ते लस-बिस बघायला गेले. ती लस आमची आहे. आमच्या पुण्यातच शोधली गेली आहे. कुठे दुसरीकडे बनवली गेली नाही. काय म्हणता, त्या संशोधन केंद्रात देशभरातले विद्वान आहेत? म्हणून काय झाले? पुणे आमचेच. कारण, इथे आमचा ‘लवासा’ आहे, इथे माझे वांग्याचे पीक आहे. आणखी आमचा ठसा पुण्यात आम्ही उमटवलाय म्हटलं. भांडारकर संशोधन केंद्र आठवते का? दादोजी कोंडदेव पुतळा आठवतो का? अजून बरेच काही आहे म्हटलं. नाद करू नका. थोडक्यात नरेंद्र मोदींनी आमचा अपमान केला आहे. पुण्यात येऊनही आमच्या कार्यकाळातील या स्मृतींना भेट दिली नाही. पुण्यात नव्हे देशभरात सगळ्यांच्या मुखात आम्हा बाप-बेटीचे नाव असते. काय म्हणता, आता अजित आणि पार्थचेही नाव असते? काहीही असो. पुण्यात येऊन वांग्याचे पीक पाहिले नाही तर काही अर्थ नाही.
 
 

सुळेबाईंचा आनंद...

 
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मल्याने सदासर्वदा आजूबाजूला चमच्यांचाच गोतावळा असणार्‍या सुप्रिया सुळेबाई. लाडाची लेक आहे. तुमच्या-आमच्यासारखे कष्ट करून अर्थाजन करायचे किंवा ज्ञानार्जन करायचे, असे काही त्यांचे फालतु नशीब नाही. त्या जाणत्या की काय राजाची लेक आहेत. अज्ञानातच सुख असते, हेच खरे. त्या सुखात सुळेबाई अखंड अष्टोप्रहर जगत आहेत. राजकुमारी सुप्रिया सुळेबाई अगदी बरोबर बोलल्या. त्या म्हणाल्या, ”दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे. एक लक्षात ठेवा, पुण्यातच कोरोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन दावा केला तर गैरसमज करु नये.” परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून खेडे, गाव, शहर, राज्ये यापेक्षा ‘एक देश’ संकल्पना मांडली आहे. त्या परिप्रेक्ष्यात पुणे भारताचेच आहे. पण सुळेबाईंना हे काही माहिती करून घ्यायचे कारण नाही. बरं! कोरोना लस संशोधन नक्की काय आहे, याबाबतही त्यांचे ज्ञान म्हणजे आनंदीआनंदच. २०१६ सालच्या नाशिकच्या महिला सभेत सुळेबाई काय म्हणाल्या, “आम्ही महिला खासदार संसदेमध्ये ‘बोअर’ होतो, मग आम्ही एकमेकींच्या साड्यांवर चर्चा करतो.” हे म्हणताना सुळेबाईंना बिल्कुल असे वाटले नाही की आपल्याला जनतेने मोठ्या अपेक्षेने संसेदत पाठवले आहे. तिथे सुळेबाईंना ‘बोअर’ होते. सुळेबाईंकडून हीच अपेक्षा. सुळेबाईंचे भाषण म्हणजे नामीच असते. फेब्रुवारी २०२० साली मराठवाड्यामध्येही त्यांनी असेच धम्माल भाषण केले. त्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, “हा पक्ष (म्हणजे राष्ट्रवादी पक्ष) हा पक्ष माझ्या बापाने रक्त गाळून उभारला आहे. पक्षाला कुणी बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे.” हे म्हणताना त्यांचा आविर्भाव, शाब्दिक उच्चार असे होते की जणू त्या राजकुमारी, त्यांचे पिता राजा आणि सगळे पक्षकार्यकर्ते त्यांचे गुलाम. पण याबाबतही कुणी चकार शब्द उच्चारला नाही ना कुणीही म्हणाले नाही की, अहो ताई कार्यकर्ते नसतील तर पक्ष राहील का? पण छे! कुणीही काही म्हणाले नाही. कदाचित सुळेबाईंच्या अज्ञानातल्या सुखात का मिठाचा खडा टाकावा, असे कार्यकर्त्यांनाही वाटले असेल. तूर्त सुळेबाई, अज्ञानाचा आनंद घ्या..



@@AUTHORINFO_V1@@