डोंबिवली निळा रस्ता : राजू पाटील म्हणतात, अधिकाऱ्यांना धुतलं पाहीजे !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020
Total Views |
ममम_4  H x W: 0
 
 

 
कल्याण : डोंबिवली फेज नंबर दोनमध्ये सर्व्हीस रोडवर शुक्रवारी निळे प्रदूषित पाणी वाहू लागल्याने संपूर्ण रस्ता हा निळा झाला होता. निळ्या रस्त्यामुळे डोंबिवलीतील प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा प्रदूषणाचा त्रास सुरू झाला आहे. त्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. प्रदूषण करणाऱ्या या कंपन्यांच्या विरोधात कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धुतले पाहिजे असे ट्विट मनसे आमदार राजू या आशयाचे ट¦ीट मनसे आमदार राजू पाटील यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना केले आहे.
 
 

ममम_3  H x W: 0 
 
 
 
डोंबिवली एमआयडीसी परिसर हा प्रदूषणामुळे कायमच चर्चेत असतो. काही वर्षापूर्वी याठिकाणी हिरवा पाऊस पडला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात प्रदूषीत सांडपाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. आत्ता निळा झाला आहे. डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील फेज नंबर दोनमधील सव्र्हीस रोडवर आज सकाळी निळया रंगाचे प्रदूषित पाणी वाहू लागले. निळा रंगाचा रस्ता पाहून नागरीकांसह पादचाऱ्यांनी एकच ओरड सुरू केली.
 

१_1  H x W: 0 x 
 
 
 
जागरुक नागरीक राजू नलावडे यांनी सांगितले की, फेब्रुवारीत प्रदूषित पाण्यामुळे रस्ता गुलाबी झाला होता. या प्रकरणी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली होती. पण त्यानंतर ही कारखानदार सुधारलेले दिसून येत नाही. गुलाबी रस्ता प्रकरणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी डोंबिवलीत येऊन रस्त्याची पाहणी केली होती. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गुलाबी रस्त्याच्या प्रकरणानंतर कारखाने नियमानुसार चालवा अन्यथा कारखान्यांना टाळे लावू असा इशारा दिला होता.
 
 

ममम_1  H x W: 0


मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार सुरक्षिततेची उपाययोजना न करता कारखाने चालविणा:या 3क्2 कारखान्यांचे सव्रेक्षण केले गेले. त्यापैकी आौद्योगिक सुरक्षिततेची ऑडीट न करणाऱ्या ३८ कारखानदारांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने पुढील कारवाई थंडावली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे कारखाने बंद होते. अनलॉकपासून हळूहळू कारखाने सुरू झाल्यावर प्रदूषणाचा मुद्दा निळ्य़ा रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
 

१_2  H x W: 0 x 
 
 
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी सांगितले की, कंपन्यांचे सांडपाणी वाहून नेणारी वाहीनी फुटल्याने प्रदूषित पाणी रस्त्यावर आले. आत्ता ते पाणी वाहने बंद झाले आहे. पाहणी करुन पुढील योग्य ती कार्यवाही केली जाईल असे स्पष्ट केले आहे. 



@@AUTHORINFO_V1@@