लोकलमध्ये मुलांसोबत महिलांना 'नो एंट्री'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Nov-2020
Total Views |

mumbai local_1  



मुंबई : लोकलमधून प्रवास करताना लहान मुलांना घेऊन प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना मज्जाव करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लोकलमधून परवानगी देण्याचा विचार करताना 'लेडीज फर्स्ट' या न्यायाने महिलांना प्रवासासाठी प्रथम पसंती देण्यात आली. पुरुष प्रवाशांना अजूनही प्रवासासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र, अनेक महिला लहान मुलांसोबत प्रवास करत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलमधून केवळ महिलांना प्रवासाची परवानगी दिलेली आहे. त्यांच्यासोबत लहान मुलांना प्रवासाची परवानगी नाही, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रेल्वेने मिशन बिगन अगेन अंतगर्त महिलांना लोकलमधून प्रवासाची मुभा दिली होती. मात्र अनेक महिला या आपल्या लहान मुलांसोबत लोकलमधून प्रवास करतात, ही बाब रेल्वेच्या लक्षात आली. त्यामुळे आता लहान मूल घेऊन प्रवास करणाऱ्या महिलेला लोकल प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.
 
 
मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या गेटवर एक आरसीएफ जवान तैनात करण्यात येणार आहे. हा आरसीएफ जवान त्या महिलेची तपासणी करेल. जर त्या महिलेसोबत लहान मूल आढळून आले, तर त्या महिलेला प्रवासाची परवानगी मिळणार नाही. तिला रेल्वे स्थानकातून पुन्हा घरी पाठवले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. कोरोनामुळे लॉकडाऊनदरम्यान मुंबई लोकल रेल्वे २२ मार्चपासून बंद होती. त्यानंतर अनलॉकिंग झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली होती.
 
 
त्यानंतर १७ ऑक्टोबरपासून महिलांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली होती. महिलांना सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत तर संध्याकाळी ७ नंतर पुढे प्रवास करता येणार आहे. मात्र अनेक महिला वेळेचे बंधन पाळत नाहीत. शिवाय मुलांनाही बरोबर घेऊन प्रवास करतात. कोरोना काळात मुलाना बरोबर घेऊन प्रवास करणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@