मनसे पदाधिकारी हत्या प्रकरण : एक अटकेत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Nov-2020
Total Views |

Thane_1  H x W:


ठाणे : मनसे प्रभाग अध्यक्ष जमील शेख हत्या प्रकरणात चौथ्या दिवशी ठाणे पोलिसांना हत्येशी संबंधित शाहिद शेख (३६) रा.राबोडी याला अटक केली. ठाणे सत्र न्यायालयाने त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मात्र, अद्याप हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसले तरी हत्येतील इतर मुख्य आरोपींच्या अटकेनंतरच अनेक बाबींचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
 
 
 
ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची सोमवारी भरदिवसा (दि.२३ नोव्हेंबर) राबोडी परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हत्या केल्याचे सीसीटिव्हीत उघड झाले होते. ठाणे पोलिसांनी कसोशीने तपास करून हत्येत सहभागी असलेल्या आणि अप्रत्यक्षपणे मदत करणारा आरोपी शाहिद शेख हा पोलिसांच्या हाती लागला. हत्येत वापरण्यात आलेली दुचाकी याच आरोपीची असुन त्यानेच हत्या करणाऱ्या शूटराना दिली होती. आरोपींनी एकच फैरी झाडल्याने घटनास्थळी पोलिसांना काडतुसाची पुंगळी सापडली आहे.
 
 
डावखरे यांनी केले जमीलच्या कुटुंबियांचे सांत्वन
 
राबोडी परिसरात दिवसाढवळ्या मनसे पदाधिकारी जमील शेख याची हत्या करण्यात आल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली.दरम्यान,भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी जमीलच्या कुटुंबियांची भेट घेऊन सात्वंन केले.
@@AUTHORINFO_V1@@